'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 02:54 PM2024-10-13T14:54:28+5:302024-10-13T14:55:15+5:30

Electric Scooters : सणासुदीच्या काळात विक्री वाढवण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्याही सूट देत आहेत.

You can buy 'these' top 5 electric scooters online, get a big discount! | 'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!

'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!

Electric Scooters : गेल्या अनेक वर्षांपासून पेट्रोलच्या वाढलेल्या किमतीमुळं इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली आहे. याशिवाय, सरकार देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. त्यासाठी फेम-1 आणि फेम-2 या अनुदानाच्या योजना सरकारनं आणल्या होत्या. याचा परिणाम म्हणजे आता देशात इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. 

ज्यामध्ये बजाज, ओला आणि अथर या प्रमुख कंपन्या आहेत. दरम्यान, सणासुदीचा हंगाम जवळ आला की, प्रत्येक कंपनी विक्रीला चालना देण्यासाठी नवनवीन उत्तम ऑफर्स घेऊन येत असते. सणासुदीच्या काळात विक्री वाढवण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्याही सूट देत आहेत. यासाठी तुम्ही अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टवरून (Flipkart) ऑनलाइन खरेदी करू शकता.

ओला एस 1 प्रो
ओला एस 1 प्रो (Ola S1 Pro) ही भारतातील सर्वाधिक मागणी असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे. या स्कूटरची किंमत 124,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. तसेच, या स्कूटरचा स्पीड ताशी 120 किमी आहे आणि 11 kW इलेक्ट्रिक मोटरसह येते. ही स्कूटर फक्त 2.6 सेकंदात 0 ते 40 किमीपर्यंत वेग वाढवू शकते. ओला इलेक्ट्रिकचा दावा आहे की, स्कूटर फुल चार्जवर 195 किलोमीटरची रेंज देते.

ओला एस1 एक्स
ओला एस1 एक्स (Ola S1X) ही एस1 रेंजसाठी बजेट स्कूटर आहे. जी फ्लिपकार्टवर 67,999 रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) उपलब्ध आहे. 2 kWh आणि 3 kWh बॅटरी पॅकच्या ऑप्शन आहे. तसेच, ही स्कूटर 151 किमीची रेंज आणि मोठ्या बॅटरीसह ताशी 90 किमीपर्यंत स्पीड पकडते.

बजाज चेतक
बजाजच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोन व्हेरिएंट आहेत. ज्यात 3201 आणि 2903 मॉडेल सामील आहेत. या अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल ऑफरचा भाग आहेत. चेतक 3201 मध्ये रेट्रो डिझाईन आहे, 123 किमी पर्यंतची रेंज आणि 63 किमी/ताशी टॉप स्पीड आहे आणि त्याची किंमत 95,998 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

एमो इंस्पायरर
एमो इंस्पायरर ही एक परवडणारी कमी-स्पीड स्कूटर आहे, ज्याची किंमत 49,989 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर 60 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. ही स्कूटर अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. 
 

Web Title: You can buy 'these' top 5 electric scooters online, get a big discount!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.