सिंगल चार्जवर 100 km रेंज, मार्केटमध्ये येणार नवीन e-Scooter; या दिवशी होणार लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 03:52 PM2024-11-08T15:52:43+5:302024-11-08T15:53:39+5:30
पहिल्या मॉडेलच्या यशानंतर कंपनीने ही नवीन X-MEN 2.0 आणली आहे.
ZELIO Ebikes : स्वदेशी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी ZELIO Ebikes भारतीय बाजारपेठेत आणखी एक EV स्कूटर आणत आहे. कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझर रिलीज केला असून, येत्या 12 नोव्हेंबर रोजी ही लॉन्च होईल. ही इलेक्ट्रिक स्कूटर दैनंदिन कामासाठी अतिशय उपयुक्त असल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीने या स्कूटरला X-MEN 2.0 नाव दिले असून, ही स्कूटर पूर्ण चार्जवर 100 किमीची रेंज देण्याचा दावा कंपनी करते.
X-MEN च्या यशानंतर आता X-MEN 2.0
कंपनीने सांगितले की, त्यांच्या पहिल्या X-MEN च्या प्रचंड यशानंतर ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणली जात आहे. कंपनीने सांगितले की, ही इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकाचा दैनंदिन प्रवासाचा अनुभव सुधारेल.
X-MEN 2.0 मध्ये काय खास असेल?
X-MEN 2.0 विविध शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांकडून येणारी मागणी लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. प्रत्येकजण ही इलेक्ट्रिक स्कूटर वापरू शकतो. शालेय विद्यार्थी असोत, महाविद्यालयीन विद्यार्थी असोत, कर्मचारी असोत किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात काम करणारी व्यक्ती ही स्कूटर वापरू शकते.
12 नोव्हेंबर रोजी लॉन्च
कंपनीने सांगितले की, नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ZELIO Ebikes च्या सर्व डीलरशिप शोरुममध्ये उपलब्ध असेल. ही स्कूटर 12 नोव्हेंबरला लॉन्च होणार आहे. त्याचबरोबर स्कूटरचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आणि किंमत देखील तेव्हाच समोर येईल.