जयराम करणार भारताचे नेतृत्व, अमेरिकन ओपन बॅडमिंटन आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:45 AM2018-06-12T01:45:35+5:302018-06-12T01:45:35+5:30
बॅडमिंटनपटू अजय जयराम मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या अमेरिकन ओपनमध्ये भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत गतचॅम्पियन एच.एस. प्रणॉय व गेल्या वर्षी उपविजेता ठरलेला पारुपल्ली कश्यप यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.
फुलर्टन - बॅडमिंटनपटू अजय जयराम मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या अमेरिकन ओपनमध्ये भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत गतचॅम्पियन एच.एस. प्रणॉय व गेल्या वर्षी उपविजेता ठरलेला पारुपल्ली कश्यप यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.
प्रणॉयने आगामी व्यस्त सत्राच्या पार्श्वभूमीवर फिटनेससाठी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. आगामी कालावधीत अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धा आहेत. त्यात मलेशिया ओपन, इंडोनेशिया ओपन, विश्वचॅम्पियनशिप आणि आशियाई स्पर्धा आदींचा समावेश आहे.
प्रणॉय म्हणाला, ‘मी अमेरिकन ओपनमध्ये सहभागी होणार नाही. कुठल्या स्पर्धेत खेळायचे, याचा मी अद्याप निर्णय घेतलेला नाही.’ कश्यप पायाला झालेल्या दुखापतीतून सावरत आहे. त्याला फेब्रुवारी महिन्यात आॅस्ट्रिया ओपनदरम्यान दुखापत झाली होती. कश्यप म्हणाला,‘आॅरलियन्स ग्रांप्रीनंतर दुखणे वाढले त्यामुळे मला खेळणे थांबवावे लागले. मी काही आठवड्यापूर्वी कोर्टवर पुनरागमन केले. थायलंडमध्ये मला खेळता येईल, अशी आशा आहे.’
स्नायूच्या दुखापतीतून सावरल्यानंतर आठ महिन्यांनी पुनरागमन करीत असलेल्या जयरामला पात्रता फेरीचा अडथळा पार करणाऱ्या खेळाडूविरुद्ध पहिल्या फेरीत खेळावे लागणार आहे. सलामी लढतीत त्याला चांगल्या कामगिरीची आशा आहे. (वृत्तसंस्था)
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत अरुणा प्रभुदेसाईला कॅनडाच्या रशेळ होनद्रिचसोबत आणि वैष्णवी रेड्डी जाक्काची लढत दुसºया मानांकित जपानच्या सयाका सातोविरुद्ध होईल.
पुरुष दुहेरीमध्ये दुसरे मानांकनप्राप्त भारतीय जोडी मनू अत्री व सुमित रेड्डी यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. पात्रता फेरीत पुरुष एकेरीत अजय कुमारला कॅनडाच्या टिमोथी चीऊच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.