Commonwealth Games 2018 : बॅडमिंटनच्या सांघिक लढतीत मलेशियाविरुद्ध भारताकडे आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 02:12 PM2018-04-09T14:12:19+5:302018-04-09T14:14:22+5:30
बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि सात्विक रँकिरेड्डी यांनी मलेशियाच्या पेंग सून चॅन आणि लिय यिंग घो यांचा पाडाव करत सुवर्णपदकावर कब्जा केला.
गोल्डकोस्ट - बॅडमिंटनच्या सांघिक अंतिम लढतीत भारतीय बॅडमिंटन संघाने आघाडी मिळवली आहे. बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि सात्विक रँकिरेड्डी यांनी मलेशियाच्या पेंग सून चॅन आणि लिय यिंग घो यांचा 21-14, 15-21 आणि 21-14 असा पाडाव करत भारताला आघाडी मिळवून दिली आहे. त्य़ानंतर पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतने चोंग वेई ली याच्यावर 21-14, 21-14 अशी मात करत भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. मात्र पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक रँकिरेड्डी चिराग शेट्टी यांना पराभव पत्करावा लागल्याने भारताची आघाडी 2-1 अशी कमी झाली आहे.
अश्विनी पोनप्पा आणि सात्विक रँकिरेड्डी यांनी सामन्यात दमदार सुरुवात करत पहिला गेम 21-14 असा जिंकला. मात्र मलेशियन खेळाडूंनी लढतीत पुनरागमन करताना दुसरा गेम 21-15 अशा फरकाने जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्येही सुरुवातीला मलेशियन खेळाडूंनी आघाडी घेतली होती. मात्र अश्विनी आणि सात्विकने पिछाडी मोडून काढली.
त्यानंतर झालेल्या पुरुष एकेरीच्या लढतीत भारताच्या किदम्बी श्रीकांतने चोंग वेई ली याच्यावर 21-14, 21-14 अशी मात केली. पुरुष दुहेरीत मात्र भारताला अपयशाचा सामना करावा लागला. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक रँकिरेड्डी चिराग शेट्टी यांना मलेशियाच्या व्ही शेम घो आणि वी कियाँग टँन यांनी पराभूत केले.