Asian Games 2018: पहिल्याच सामन्यात सिंधूचा विजयासाठी संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 01:33 PM2018-08-23T13:33:44+5:302018-08-23T13:34:45+5:30
Badminton at Asian Games 2018: पहिल्याच सामन्यात सिंधूचा विजयासाठी संघर्ष
जकार्ता - रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला विजयासाठी झगडावे लागले. सिंधूने 21-10, 12-21, 23-21 अशा फरकाने व्हिएतनामच्या वू थी ट्रँगचा पराभव केला आणि बाद फेरीत प्रवेश केला.
And @Pvsindhu1 have secured the decider 23-21. The Indian seed 3 faced little scare from Vietnam's VT Trang in the final moments of the match but displayed nerves of steel to romp home winners. Great performance!! Proud of you!#IndiaontheRise#IndiaAtAsianGamespic.twitter.com/LV8ny9VOv7
— BAI Media (@BAI_Media) August 23, 2018
ट्रँगने महिला एकेरीच्या पहिल्याच सामन्यात जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेल्या सिंधूला झुंजवले. सिंधूने पहिला गेम 21-10 असा अवघ्या 11 मिनिटांत जिंकून आघाडी घेतली. मात्र ट्रँगने दमदार पलटवार करताना 17 मिनिटांच्या संघर्षानंतर दुसरा गेम 21-12 असा जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली. चुरशीच्या रंगलेल्या तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी बहारदार खेळ केला. सिंधूला चौथ्या गेम पॉइंटवर सामना जिंकण्यात यश आले. तिने 29 मिनिटांच्या हा गेम 23-21 असा जिंकला.
महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी या भारतीय जोडीने हाँगकाँगच्या एनजी वी आणि येऊंग एनटी यांच्यावर अवघ्या 32 मिनिटांत 21-16, 21-15 असा विजय मिळवून बाद फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीत रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीनेही 32 मिनिटांत 21-12, 21-14 अशा फरकाने हाँगकाँगच्या चूंग वाय व टॅम सीएच यांच्यावर मात केली. महिला दुहेरीत रूतपर्ण पांडा व आरती सुनील या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. थायलंडच्या चलादचालम सी व मुएवोंग पी या जोडीने 21-11, 21-16 असा विजय मिळवला.