बॅडमिंटन : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 18:35 IST2018-07-12T18:30:38+5:302018-07-12T18:35:57+5:30
उप-उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिच्यावर 21-16, 21-14 असा सहज विजय मिळवला.

बॅडमिंटन : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल
बँकॉक : भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिच्यावर 21-16, 21-14 असा सहज विजय मिळवला.
सामन्याच्या सुरुवातीपासून सिंधूने आक्रमक खेळावर भर दिला आणि त्यामध्ये तिला यश मिळाले. पहिल्या गेममध्ये यिनने सिंधूला चांगली लढत दिली. पण सिंधूने तिला कडवी झुंज देत पहिला गेम 21-16 असा जिंकला. पहिला गेम जिंकल्यावर सिंधूचे मनोबल कमालीचे उंचावले आणि त्याचा फरक खेळातही जाणवला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने आपल्या खेळातील आक्रमकपणा वाढवला. त्यामुळे दुसरा गेम 21-14 असा सहज जिंकत तिने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.