बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिप : भारताची नजर सुवर्णपदकावर, श्रीकांत, सिंधूकडून चमकदार कामगिरीची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:36 AM2017-08-21T01:36:55+5:302017-08-21T01:37:23+5:30

फॉर्मात असलेला किदाम्बी श्रीकांत आणि दोनदा कांस्यपदकाची मानकरी ठरलेली पी. व्ही. सिंधू सोमवारपासून प्रारंभ होणाºया बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये २१ सदस्यांचा समावेश असलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व करणार आहेत. या स्पर्धेत भारताची नजर सुवर्णपदकावर केंद्रित झाली आहे.

 Badminton World Cup: India eye gold, Srikanth, Sindh hope for shiny performance | बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिप : भारताची नजर सुवर्णपदकावर, श्रीकांत, सिंधूकडून चमकदार कामगिरीची आशा

बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिप : भारताची नजर सुवर्णपदकावर, श्रीकांत, सिंधूकडून चमकदार कामगिरीची आशा

Next

ग्लास्गो : फॉर्मात असलेला किदाम्बी श्रीकांत आणि दोनदा कांस्यपदकाची मानकरी ठरलेली पी. व्ही. सिंधू सोमवारपासून प्रारंभ होणाºया बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये २१ सदस्यांचा समावेश असलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व करणार आहेत. या स्पर्धेत भारताची नजर सुवर्णपदकावर केंद्रित झाली आहे.
इंडोनेशिया व आॅस्ट्रेलियामध्ये सलग जेतेपद पटकावल्यानंतर श्रीकांत कामगिरीत सातत्य राखत विश्व चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक पहिले पदक पटकावण्यास उत्सुक आहे.
सलग तीन स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केल्यानंतर श्रीकांत येथे दाखल झाला आहे, तर सिंधू यंदा गेल्या सुपर सिरीज स्पर्धांमध्ये दोनदा उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरली आहे.
सिंधूला दुसºया फेरीत कोरियाची किम हयो मिन व मिस्रची हादिया होस्री यांच्यादरम्यानच्या लढतीतील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सिंधू उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरली तर तेथे तिची गाठ चीनच्या सुन यूसोबत पडण्याची शक्यता आहे.
सायनाला स्वित्झर्लंडची सबरिना जाकेट व युक्रेनची नटाल्या वोयेतसेख यांच्यातील विजेत्या खेळाडूसोबत खेळावे लागेल. उपउपांत्यपूर्व गाठल्यास सायनाला दुसºया मानांकित कोरियाच्या सुंग जी हुनच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंनी मात्र यंदाच्या मोसमात वर्चस्व गाजविले आहे. त्यांनी सहा स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावले आहे. त्यात १५ व्या मानांकित बी. साई प्रणितने सिंगापूरमध्ये प्रथमच सुपर सिरीज जेतेपद पटकावले, तर समीर वर्माने लखनौमध्ये सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत विजेतेपद पटकावले. थायलंड ग्रांप्री गोल्ड स्पर्धा जिंकणाºया प्रणितला पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या वेई नामच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, तर अजय जयरामची पहिल्या फेरीत गाठ आॅस्ट्रियाच्या लुका रॅबरसोबत पडणार आहे.
श्रीकांतची लढत रशियाच्या सरगे सिरांतसोबत होईल. श्रीकांत अ‍ॅन्ड कंपनीला स्टार खेळाडूंच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्टार खेळाडूंमध्ये दोनदा जेतेपद पटकावणारा आॅलिम्पिक चॅम्पियन चेन लोंग, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सोन वान, अनुभवी ली चोंग वेई, डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसन, चीनचा शी युकी व पाच वेळचा विश्वचॅम्पियन लीन डॅन आदींचा समावेश आहे.
महिला एकेरीमध्ये राष्ट्रीय चॅम्पियन रितूपर्णा दासला पहिल्या फेरीत एरी मिकेला, तर तन्वी लाडला इंग्लंडच्या चोले बर्चच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली ताई जु यिंग या स्पर्धेत सहभागी झालेली नाही. त्यामुळे तिसरे मानांकन प्राप्त व दोनदा जेतेपदाचा मान मिळवणाºया कॅरोलिना मरिनचे भारतीय खेळाडू सायना व सिंधू यांच्यापुढे कडवे आव्हान राहील. भारतीय खेळाडूंना जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानावर असलेली जपानची यामागुची व तिसºया क्रमांकावरील दक्षिण कोरियाची सुंग जी यून यांच्यापासूनही सावधगिरी बाळगावी लागेल. (वृत्तसंस्था)

आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या सिंधूने २०१६ चायना ओपन व २०१७ इंडिया ओपन या स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावले आहे. २०१३ व २०१४ मध्ये विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरलेली सिंधू या वेळी पदकाचा रंग बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- पी. व्ही. सिंधू

मी खरंच चांगला खेळत असून आत्मविश्वास उंचावलेला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होताना प्रत्येक खेळाडूचा फिटनेस दर्जेदार असतो. त्यामुळे मी आताच अंतिम फेरी गाठण्याबाबत विचार करीत नाही, पण माझे लक्ष पहिल्या फेरीच्या लढतीवर केंद्रित झाले आहे.
- श्रीकांत

Web Title:  Badminton World Cup: India eye gold, Srikanth, Sindh hope for shiny performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.