बंगळुरू ब्लास्टर्स संघाचा दिल्ली डॅशर्सवर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:32 IST2017-12-29T00:32:36+5:302017-12-29T00:32:48+5:30

नवी दिल्ली : जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने बंगळुरू ब्लास्टर्सकडून खेळताना ट्रम्प लढतीत दिल्ली डॅशर्सच्या तियान होईवेई याला पराभूत करत संघाचा विजय निश्चीत केला.

Bangalore Blasters win the Delhi Dashers | बंगळुरू ब्लास्टर्स संघाचा दिल्ली डॅशर्सवर विजय

बंगळुरू ब्लास्टर्स संघाचा दिल्ली डॅशर्सवर विजय

नवी दिल्ली : जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने बंगळुरू ब्लास्टर्सकडून खेळताना ट्रम्प लढतीत दिल्ली डॅशर्सच्या तियान होईवेई याला पराभूत करत संघाचा विजय निश्चित केला.
येथील सिरी फोर्ट क्रीडा परिसरात खेळलेल्या गेलल्या या रोमांचक लढतीत एक्सेलसेन याने १५-११, १५-११ असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवत संघासाठी दोन गुण मिळवले आहेत. त्याने विजयासोबतच संघाची आघाडी ४-२ अशी केली. पहिल्या मिश्र दुहेरी सामन्यात बंगळुरू ब्लास्टर्स संघाच्या किम सा रंग आणि सिक्की रेड्डीच्या जोडीने दिल्लीच्या व्लामिदीर इवानोव आणि अश्विनी पोनाप्पा या जोडीला १०-१५, १५-१२, ११-१५ असे पराभूत करत पहिला सामना जिंकला.
पुरूष एकेरीतील अन्य सामन्यात बंगळुरूच्या चोंग वेई फेंग याने उलटफेर करत दिल्लीच्या विन्सेट वोंग विंग की याला १०-१५, १५-१३, १५-८ असे पराभूत केले. रँकिंगमध्ये फेंग हा ४५ व्या, तर विन्सेट हा १५ व्या स्थानावर आहे. महिला एकेरी लढतीमध्ये दिल्लीच्या सुंग जी ह्यून हिने बंगळुरूच्या ख्रिस्ती गिलमोरचा १५-१०, ८-१५, १५-५ असा पराभव केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Bangalore Blasters win the Delhi Dashers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton