चायना ओपन बॅडमिंटन, सिंधू उप-उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 04:25 AM2019-09-19T04:25:42+5:302019-09-19T04:25:51+5:30

आॅलिम्पिकची माजी सुवर्ण विजेती ली शुएरुई हिच्यावर सहज विजयासह चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

China Open Badminton, Indus in the sub-quarterfinals | चायना ओपन बॅडमिंटन, सिंधू उप-उपांत्यपूर्व फेरीत

चायना ओपन बॅडमिंटन, सिंधू उप-उपांत्यपूर्व फेरीत

Next

चांग्झू (चीन) : विश्व चॅम्पियन पी. व्ही. सिंधू हिने बुधवारी आॅलिम्पिकची माजी सुवर्ण विजेती ली शुएरुई हिच्यावर सहज विजयासह चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. त्याचवेळी, सायना नेहवाल हिला मात्र एकेरीच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागल्याने तिला स्पर्धेबाहेर पडावे लागले.
सायना जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानावरील थायलंडची बुसानन ओंगबामरंगफान हिच्याविरुद्ध ४४ मिनिटात १०-२१, १७-२१ ने पराभूत झाली. विश्व क्रमवारीतील माजी नंबर वन सायनाचा थायलंडच्या प्रतिस्पर्धीविरुद्ध हा सलग दुसरा पराभव होता.
दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या २९ वर्षीय सायनाला फॉर्म परत मिळविण्यासाठी अक्षरश: झुंजावे लागत आहे. सायनाने यंदा सुरुवातीला इंडोनेशिया ओपन जेतेपद पटकविले. त्यानंतर मात्र ती कुठल्याही स्पर्धेची अंतिम फेरी गाठू शकली नाही. पुरुष गटाच्या एकेरीत बी. साईप्रणीतने थायलंडचा सुपान्यू अविहिंगसेनोन याच्याविरुद्ध २१-१९, २१-२३, २१-१४ असा झुंजार विजय मिळवला. पहिला गेम जिंकून आश्वासक सुरुवात केलेल्या साईप्रणीतला दुसºया गेममध्ये खूप घाम गाळावा लागला. त्याने हा गेम थोडक्यात गमावल्याने सामना अखेरच्या गेमपर्यंत लांबला. यावेळी मात्र साईप्रणीतने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत सुपान्यूला एकही संधी न देता बाजी मारली.
प्रणव जेरी चोप्रा- एन. सिक्की रेड्डी या मिश्र दुहेरी जोडीला जर्मनीचा मार्क लॅम्सफस- इसाबेल हर्टरिच यांच्याकडून २१-२१, २१-२३ ने पराभवाचा धक्का बसला.
>स्टार सिंधूने ३४ मिनिटात शुएरुईवर २१-१८, २१-१२ अशा फरकाने मात केली. सिंधूला जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या शुएरुईवर विजय नोंदविण्यासाठी फारसा घामही गाळावा लागला नाही. या आधी सलग तीन सामने गमविणाºया सिंधूने शुएरूईवर कारकिर्दीत बुधवारी चौथ्यांदा विजय साजरा केला.

Web Title: China Open Badminton, Indus in the sub-quarterfinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.