Denmark Open Badminton : सहा वर्षांनंतरही सायनाला जेतेपदाची हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 04:32 PM2018-10-21T16:32:38+5:302018-10-21T17:02:36+5:30

Denmark Open Badminton : सहा वर्षांनंतर डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सायना नेहवालला जेतेपदाने हुलकावणी दिली.

Denmark Open Badminton: Six years later, Saina has not been able to win the title | Denmark Open Badminton : सहा वर्षांनंतरही सायनाला जेतेपदाची हुलकावणी

Denmark Open Badminton : सहा वर्षांनंतरही सायनाला जेतेपदाची हुलकावणी

डेन्मार्क : सहा वर्षांनंतर डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सायना नेहवालला जेतेपदाने हुलकावणी दिली. तैपेईच्या ताय त्झु यिंगने सायनाला पराभूत केले आणि डेन्मार्क स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सलग अकरा सामन्यांत यिंगने सायनावर विजय मिळवण्याचा पराक्रम केला. 



सायना आणि यिंग यांच्यात सहाव्या गुणासाठी 38 शॉट्सची रॅली रंगली. यिंगने 5-1 अशी आघाडी घेताना सायनावर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जोरकर स्मॅश आणि नेट प्लेसिंगचा उत्तम खेळ करताना यिंगने आघाडी 8-3 ने वाढवली. मात्र, सायनाने हार न मानता पिछाडी 8-13 अशी कमी करण्याचा प्रयत्न केला. सामना 19-13 अशा आघाडीवर असताना सायनाने फाऊल करत यिंगला गेम जिंकण्याची संधी दिली. यिंगने पहिला गेम अवघ्या 15 मिनिटांत 21-13 असा घेतला. 

सायनाने दुसऱ्या गेममध्ये अगदी सावध खेळावर भर दिला. तिने यिंगच्या प्रत्येक खेळाचा अभ्यास करताना 5-2 अशी आघाडी घेतली, परंतु यिंगने जोरदार कमबॅक केला. सायनाचे फटके परतवताना यिंगने अनेकदा कॉक सोडण्यावर भर दिला. पण तिचे अंदाज चुकले. सायनाने त्याचाच फायदा घेत 10-5 अशी आघाडी वाढवली. त्यानंतर सायनाने खेळ उंचावताना सामन्यावर पकड घेतली. प्रत्येक गुणासोबत तिची जिंकण्याची जिद्द वाढताना दिसत होती. सायनाने हा गेम 21-13 असा घेत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.



तिसऱ्या गेममध्ये सायनाच्या हातून सामना निसटताना दिसला. यिंगने 11-2 अशी आघाडी घेत निकाल स्पष्ट केला होता. यिंगने हा गेम 21-6 असा जिंकून जेतेपद पटकावले.

  • सायनाने 21 ऑक्टोबर 2012 मध्ये पहिले आणि एकमेव डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. 


  • सायना आणि ताय त्झु यिंग यांच्यात आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांत तैपेईच्या खेळाडूचे पारडे जड आहे. यिंगने 12 वेळा सायनाला पराभूत केले आहे, तर सायनाला केवळ पाच विजय मिळवता आलेले आहेत. 
  • सायनाने 2013 मध्ये यिंगवर अखेरचा विजय मिळवला होता. स्वीस ओपन स्पर्धेत सायनाने 21-11, 21-12 अशी बाजी मारली होती, त्यानंतर सलग दहा सामन्यांत यिंगविरुद्ध सायनाची विजयाची पाटी कोरीच राहिली आहे.

Web Title: Denmark Open Badminton: Six years later, Saina has not been able to win the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.