दुबई ओपन बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधू सुसाट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 09:53 PM2017-12-15T21:53:11+5:302017-12-15T21:54:56+5:30
दुबई : सलग दोन सामने जिंकून दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने सलग तिसरा विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा फडशा पाडला.
दुबई : सलग दोन सामने जिंकून दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने सलग तिसरा विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा फडशा पाडला. या शानदार विजयासह सिंधूने दिमाखात बाजी मारत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना धोक्याचा इशारा दिला आहे.
सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकलेल्या सिंधूसाठी तिसरा सामना औपचारीकतेचा ठरला होता. मात्र, सराव करण्याची याहून उत्तम संधी नसल्याची जाणीव असल्याने सिंधूने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत आपले वर्चस्व राखले होते. पहिल्याच गेममध्ये ५-० अशी भक्कम आघाडी घेतलेल्या सिंधूने अखेरपर्यंत यामागुचीला डोके वर काढण्याची संधी दिली नाही आणि २१-९, २१-१३ असा दणदणीत विजय मिळवला. सिंधूने केवळ ३६ मिनिटांमध्ये विजयाची नोंद करताना ‘अ’ गटात अव्वल स्थान मिळवले.
पहिला गेम सहजपणे बाजी मारलेल्या सिंधूला दुसºया गेममध्ये यामागुचीकडून कडवी झुंज मिळाली. यावेळी यामागुची पुनरागमन करत सिंधूला झुंजवणार असे दिसत होते. मात्र, जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानी असलेल्या सिंधूने आपला हिसका जपानी खेळाडूला दाखवला. एकवेळ यामागुचीने ४-४ अशी बरोबरी साधत सामन्यात रंग भरले खरे, परंतु यानंतर सिंधूने ७-५ अशी आघाडी घेत अखेरपर्यंत आपले वर्चस्व राखले. सिंधूच्या वेगवान खेळापुढे यामुगाचीला सूर गवसला नाही. सिंधूच्या नेटवरील जबरदस्त खेळापुढे यामागुचीने नियंत्रण गमावले. सिंधूने आपल्या सलामीच्या सामन्यात चीनच्या ही बिंगजियाओला नमवल्यानंतर, दुसºया सामन्यात जपानच्याच सायाका सातो हिचा २१-१३, २१-१२ असा धुव्वा उडवला होता. (