अपेक्षांमुळे दबाव वाढत नाही - पी. व्ही. सिंधू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 04:41 AM2020-01-22T04:41:24+5:302020-01-22T04:42:33+5:30
‘माझ्याकडून चाहत्यांना असलेल्या अपेक्षांमुळेच अधिक मेहनतीसाठी प्रेरणा मिळते,’ असे आॅलिम्पिकमध्ये दुसरे पदक जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पी. व्ही. सिंधूने सांगितले.
चेन्नई : ‘माझ्याकडून चाहत्यांना असलेल्या अपेक्षांमुळेच अधिक मेहनतीसाठी प्रेरणा मिळते,’ असे आॅलिम्पिकमध्ये दुसरे पदक जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पी. व्ही. सिंधूने सांगितले.
सिंधू म्हणाली की, ‘रिओ आॅलिम्पिकपासून आतापर्यंत माझ्या आयुष्यात खुप बदल झाले. मी अनेक सामने जिंकले आणि काहींमध्ये पराभव स्विकारावा लागला. रिओ स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर आता सर्वांनाच आगमी टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेत माझ्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.’
चाहत्यांच्या अपेक्षांपुढे दडपण येत नसल्याचे सांगताना सिंधू पुढे म्हणाली की, ‘जेव्हा चाहते माझ्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा करतात तेव्हा मी याकडे नेहमीच सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते. चाहत्यांच्या अपेक्षा माझ्यावर अतिरिक्त दबाव नसतो. यामुळे मला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा मिळते. हे नक्कीच सोपे नसले, तरी मी मात्र हे आव्हान स्विकारण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.’ (वृत्तसंस्था)
पीबीएलमध्ये ताय जु यिंग सारख्या अव्वल स्थानावरील खेळाडूंविरुद्ध खेळण्याची
संधी मिळेल. हे वर्ष आॅलिम्पिकसाठी फायदेशीर ठरेल. आम्ही परदेशी खेळाडूंकडून खूप काही शिकलो. ते उपयुक्त सल्ले देत असल्यामुळे खेळाडू म्हणून पुढे जाण्यास मदत मिळते.
- पी. व्ही. सिंधू