माझी ताकद आणखी वाढवावी लागेल - सायना नेहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 01:27 AM2017-10-20T01:27:45+5:302017-10-20T01:28:16+5:30
पुन्हा एकदा अव्वल १० स्थानांमध्ये येण्याकरता आणि अव्वल खेळाडूंना पराजित करण्यासाठी मला माझी ताकद अधिक वाढवावी लागेल, याची जाणीव मला ग्लास्गो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत झाली.
ओडेन्से : पुन्हा एकदा अव्वल १० स्थानांमध्ये येण्याकरता आणि अव्वल खेळाडूंना पराजित करण्यासाठी मला माझी ताकद अधिक वाढवावी लागेल, याची जाणीव मला ग्लास्गो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत झाली, अशी प्रतिक्रीया भारताची फुलराणी सायना नेहवालने दिली.
सध्या सुरू असलेल्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायनाने कट्टर प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरिनला नमवून स्पर्धेला शानदार सुरुवात केली. सामना संपल्यानंतर सायना म्हणाली, ‘मी क्रमवारीत १२व्या स्थानी आहे. त्यामुळे मला सुरुवातीला अव्वल खेळाडूंविरुद्ध खेळावे लागत आहे. त्याचप्रमाणे, ‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेने मला धडाही शिकवला आहे, की मला ताकद वाढवण्यावर अधिक मेहनत
घ्यावी लागेल. माझ्या मते माझे फटके वेगवान नव्हते. नोजोमी ओकुहारा, कॅरोलिन आणि सिंधू यांच्यातील सुधारणा पाहून आणि ते ज्या प्रकारे मोठ्या रॅली खेळतात ते पाहून लगेच कल्पना येईल. तरी मी या खेळाडूंची थोडीफार बरोबरी केली असून मला आणखी सुधारणा करावी लागेल,’ असेही सायना हिने यावेळी म्हटले. (वृत्तसंस्था)
माझ्याहून क्रमवारीत खालच्या स्थानी असलेल्या अनेक खेळाडूंना सोपा ड्रॉ मिळाला. त्यामुळे मी सामन्याआधी मला मिळालेल्या ड्रॉ विषयी खूप विचार केला. पण मला कल्पना आहे की, अव्वल दहामध्ये येण्यासाठी मला आघाडीच्या खेळाडूंना नमवावेच लागेल. - सायना नेहवाल