‘मला जोरदार पुनरागमन करावेच लागेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:39 AM2018-03-19T01:39:07+5:302018-03-19T01:39:07+5:30
भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिला आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या रोमांचक उपांत्य फेरीच्या सामन्यात जगातील दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू अकाने यामागुची हिच्याकडून पराभव पत्करावा लागला.
बर्मिंगहॅम : भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिला आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या रोमांचक उपांत्य फेरीच्या सामन्यात जगातील दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू अकाने यामागुची हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यावर रविवारी सिंधू म्हणाली की, ‘मला आता जोरदार पुनरागमन करावेच लागेल.’
शनिवारी रात्री चौथ्या मानांकित सिंधूला एक तास १९९ मिनिटे चाललेल्या या लढतीत २१-१९, १९-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. सिंधू म्हणाली की, हा माझा दिवस नव्हता. मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला. उतार-चढाव हे सुरूच असतात आणि एकाचाच विजय होतो. यात लांब रॅलीज् होत्या आणि ती चांगली खेळली. तीन गेमचा सामना जिंकणे सोपे नसते. अखेरच्या क्षणी २-३ गुणांचे अंतर मोठे वाटते. या स्पर्धेतून मला खूप काही शिकायला मिळाले. ही स्पर्धा माझ्यासाठी चांगली राहिली आणि मला जोरदार पुनरागमन करावे लागेल.’ यामागुची म्हणाली, ‘विजय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळाली. मी अखेरपर्यंत आक्रमक खेळ केला. यामुळेच मी विजय मिळवण्यात यशस्वी ठरली.’