आॅलिम्पिकच्या तुलनेत मागील दोन महिने मी भक्कम तयारी केली - कॅरोलिना मारिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 08:43 PM2017-08-21T20:43:19+5:302017-08-21T20:43:47+5:30
रिओ आॅलिम्पिकच्या तुलनेत अधिक भक्कम तयारी असल्याने सुवर्ण जिंकण्याची आशा आहे. विश्व चॅम्पियनशिपच्या जेतेपदाची हॅ्ट्ट्रिक देखील नोंदविण्याचे लक्ष्य असल्याचे माजी विश्व विश्वचॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिन हिने म्हटले आहे.
ग्लास्गो: रिओ आॅलिम्पिकच्या तुलनेत अधिक भक्कम तयारी असल्याने सुवर्ण जिंकण्याची आशा आहे. विश्व चॅम्पियनशिपच्या जेतेपदाची हॅ्ट्ट्रिक देखील नोंदविण्याचे लक्ष्य असल्याचे माजी विश्व विश्वचॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिन हिने म्हटले आहे.
रिओमध्ये सुवर्ण जिंकणारी मारिन पत्रकारांशी बोलताना म्हणाली, रिओ आॅलिम्पिकच्या तुलनेत मागील दोन महिने मी भक्कम तयारी केली आहे.
सुवर्णासाठी खेळणे हे माझे मुख्य लक्ष्य असेल. या दरम्यान काही कडव्या संघर्षाचा सामना करावा लागेल, पण जेतेपदाचा विचार करण्याऐवजी दरवेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. रिओ आॅलिम्पिकनंतर मारिनला जांघेच्या दुखापतीचा सामना करावा लागला होता.
यामुळे कामगिरीवर परिणाम झाल्याने एकही जेतेपद जिंकू शकली नव्हती. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान भूषविणारी मारिन पुढे म्हणाली, आॅलिम्पिक वर्षभराआधी झाले. मला ते विसरावे लागेल. नतर जखमांनी त्रस्त असल्याने चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. पण आता पुन्हा सज्ज आहे. तिसरी मानांकित मारिनला सुरुवातीला पुढे चाल मिळाली असून तिचा पहिला सामना हाँगकाँग आणि रशियाच्या खेळाडूंमधील सामन्यातील विजयी खेळाडूविरुद्ध होणार आहे.