इंडिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन : लक्ष्य सेन, एम. तनिष्क यांचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 02:09 AM2017-11-28T02:09:20+5:302017-11-28T02:11:18+5:30

लक्ष्य सेन आणि एम. तनिष्क यांनी आपला चमकदार खेळ कायम राखताना इंडिया आंतरराष्ट्रीय सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकावले.

 India International Badminton: Goal Sen, M. Tanishq's domination | इंडिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन : लक्ष्य सेन, एम. तनिष्क यांचे वर्चस्व

इंडिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन : लक्ष्य सेन, एम. तनिष्क यांचे वर्चस्व

Next

हैदराबाद : लक्ष्य सेन आणि एम. तनिष्क यांनी आपला चमकदार खेळ कायम राखताना इंडिया आंतरराष्ट्रीय सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकावले. दोन्ही खेळाडूंनी तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात झुंजार विजयासह बाजी मारली.
भारताच्या चौथ्या मानांकित लक्ष्यने मलेशियाच्या यीन हान चोंग याचे तगडे आव्हान २१-१५, १७-२१, २१-१७ असे परतावले. पहिला
गेम जिंकून आश्वासक सुरुवात केल्यानंतर लक्ष्यला चोंगकडून कडवी टक्कर मिळाली. या वेळी चोंगने
दुसरा गेम जिंकून सामना तिसºया गेममध्ये नेला. या वेळी लक्ष्यने अखेरच्या क्षणी आपली आघाडी न गमावताना जबरदस्त नियंत्रण राखत बाजी मारली.
दुसरीकडे, महिलांच्या गटातील अंतिम सामनाही तीन गेमपर्यंत रंगला. तनिष्कने भारताच्या शिखा गौतमचे कडवे आव्हान १७-२१, २२-२०, २१-१८ असे परतावले. पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर तनिष्कने जबरदस्त पुनरागमन करताना सलग दोन गेम जिंकत सामन्याचे
चित्र पालटले. (वृत्तसंस्था)

Web Title:  India International Badminton: Goal Sen, M. Tanishq's domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton