इंडिया ओपन बॅडमिंटन : कार्तिकेय, श्रेयांश, आकर्षी, रिया यांचा मुख्य फेरीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:37 AM2018-01-31T01:37:46+5:302018-01-31T01:37:56+5:30
कार्तिकेय गुलशनकुमार, श्रेयांश जैस्वाल यांनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. महिला गटात आकर्षी कश्यप व रिया मुखर्जी यांनी मुख्य फेरी गाठली.
नवी दिल्ली : कार्तिकेय गुलशनकुमार, श्रेयांश जैस्वाल यांनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. महिला गटात आकर्षी कश्यप व रिया मुखर्जी यांनी मुख्य फेरी गाठली.
कार्तिकेयने पात्रता फेरीत अनुभवी सिरिल वर्माला पराभूत केल्यानंतर दुसºया फेरीत बोधित जोशीवर मात केली. मुख्य फेरीत त्याची लढत शुभंकर डे याच्याशी होणार आहे.
श्रेयांकने दोन्ही फेरीतील सामने सहज जिंकले. त्याने पहिल्या फेरीत रंजन राजा रंजनला तर दुसºया फेरीत अभिषेक येलगर याला पराभूत केले. मुख्य फेरीत मात्र त्याची लढत सोपी असणार नाही. त्याची लढत एच. एस. प्रणयशी होणार आहे. पुरुष एकेरीत मलेशियाच्या डेरेन ल्यू व जुल्करनैन यांनीही मुख्य फेरीत प्रवेश केला.
महिला गटात अग्रमानांकित रुषाली गुम्मादी व इरा शर्मा यांना पराभवाचा धक्का बसला. रुषालीला आकर्षीने तर इराला रियाने पराभूत करत मुख्य फेरी गाठली. रियाची लढत स्पेनच्या बिटरिज कोरालेसबरोबर, तर ्र्रआकर्षीची लढत अनुरा प्रभुदेसाईशी होणार आहे.
पुरुष व महिलांच्या एकेरीमध्ये भारताचा संघ बलाढ्य असून भारताचे प्रतिनिधित्व के. श्रीकांत, प्रणय, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल हे खेळाडू करणार आहेत. पुरुषांच्या दुहेरीमध्ये तुषार शर्मा व चंद्रभूषण त्रिपाठी, कृष्णा प्रसाद गरागे व धु्रव कपिला, एल्विन फ्रान्सिस व के. नंदगोपाल, रोहन कपूर व शिवम शर्मा या
जोडींनी मुख्य फेरीत प्रवेश केला
आहे. महिला दुहेरीमध्ये शेनन ख्रिस्तियन व रिया गज्जर , रितुपर्णा पांडा व मिथिला युके या जोडीने
मुख्य फेरी गाठली. मिश्र दुहेरीत भारताच्या सर्व आठही जोडींनी मिश्र दुहेरीत प्रवेश केला.