इंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधू, सायना, समीर उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:26 AM2018-02-02T01:26:57+5:302018-02-02T01:27:09+5:30

आॅलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांनी महिलांच्या गटात तर समीर वर्मा, पी. कश्यप यांनी पुरुषांच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याने इंडोनेशियाचा अनुभवी टामी सुगियार्तो याला पराभवाचा धक्का दिला.

 India Open badminton: Sindhu, Saina and Sameer in the quarter-finals | इंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधू, सायना, समीर उपांत्यपूर्व फेरीत

इंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधू, सायना, समीर उपांत्यपूर्व फेरीत

Next

नवी दिल्ली : आॅलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांनी महिलांच्या गटात तर समीर वर्मा, पी. कश्यप यांनी पुरुषांच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याने इंडोनेशियाचा अनुभवी टामी सुगियार्तो याला पराभवाचा धक्का दिला. अन्य एका सामन्यात पारुपल्ली कश्यप याने पिछाडीवरुन दमदार बाजी मारताना उपांत्यपूर्व फेरी गाठली.
जागतिक क्रमवारीत ३०व्या स्थानी असलेल्या समीरने १ तास २० मिनिटे चाललेल्या लढतीत सुगियार्तोला २१-१८, १९-२१, २१-१७ असा धक्का दिला. अन्य लढतीत कश्यपने पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना भारताचा
युवा श्रेयांश जयस्वाल याचे कडवे आव्हान १९-२१, २१-१९, २१-१२ असे परतावले.
यासह कश्यपने दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोणत्याही सुपर सिरिज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. याआधी कश्यपने २०१५ साली जपान ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. पुढच्या फेरीत कश्यपपुढे चीनच्या कियाओ बिन याचे तगडे आव्हान असेल.
महिलांच्या एकेरीत पी. व्ही. सिंधूने ४२ मिनिटांत बुल्गेरियाच्या जेटचिरी लिडाला २१-१०, २१-१४ तर सायना नेहवालने डेन्मार्कच्या लाईन होमार्क जार्सफेल्ट ३४ मिनिटांत २१-१२, २१-११ असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)

सात्त्विकसाईराज-अश्विनी यांची आगेकूच

मिश्र दुहेरीगटात भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी चमकदार कामगिरी करताना टेन कियान मेंग-लाइ पेइ जिंग या मलेशियाच्या तिसºया मानांकीत जोडीला नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात रोमांचक बाजी मारताना सात्त्विकसाईराज-अश्विनी यांनी मेंग-जिंग यांचा २१-१६, १५-२१, २३-२१ असा पराभव केला.

Web Title:  India Open badminton: Sindhu, Saina and Sameer in the quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.