ऑलिम्पिकमध्ये भारत सुवर्ण पटकावेल- पुलेला गोपीचंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 04:04 AM2019-01-22T04:04:00+5:302019-01-22T04:04:08+5:30
‘भारत २०२० मध्ये टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपले पहिले सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी होईल,’ अशी आशा भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना आहे.
मुंबई : ‘भारत २०२० मध्ये टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपले पहिले सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी होईल,’ अशी आशा भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना आहे.
गोपीचंद म्हणाले,‘गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही यापूर्वीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. बीजिंग आॅलिम्पिक २००८ मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणे चांगला निकाल होता. त्यानंतर २०१२मध्ये (लंडन आॅलिम्पिक) आपण प्रथमच कांस्य (सायना नेहवाल) पदक पटाकवले आणि २०१६मध्ये (रिओ आॅलिम्पिक) प्रथमच रौप्यपदक (पी.व्ही. सिंधू) पटकावले. त्यामुळे २०२०मध्ये (टोकियो आॅलिम्पिक) आपल्याला पहिले सुवर्णपदक पटकावण्यात यश येईल.’ गोपीचंद पुढे म्हणाले,‘सुरुवातीला बॅडमिंटन पुरुष एकेरीतील खेळाडू सुरेश गोयल, नंदू नाटेकर व प्रकाश पादुकोण आणि अन्य कारणांमुळे ओळख होती, पण सायनाने हा ट्रेंड बदलला. सायना व सिंधू यांच्या आगमनापूर्वी बॅडमिंंटन पुरुष एकेरीतील खेळाडूमुळे ओळखल्या जात होता. आता हा ट्रेंड बदलला असून त्यात सायनाची भूमिका महत्त्वाची ठरली.’ (वृत्तसंस्था)