Japan Badminton Open: सिंधूला पराभवाचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 15:59 IST2018-09-13T15:58:49+5:302018-09-13T15:59:43+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूला जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला आहे.

Japan Badminton Open: सिंधूला पराभवाचा धक्का
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूला जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला आहे. पुरुषांमध्ये एस. एच प्रणॉय पराभूत झाला असला तरी किदम्बी श्रीकांतने मात्र विजय मिळवला आहे.
पहिल्या फेरीत सिंधूने विजय मिळवला होता. पण दुसऱ्या फेरीत मात्र तिला चीनच्या फँगजी गाओकडून पराभव स्वीकारावा लागला. गाओने सिंधूवर दुसऱ्या फेरीत 21-18, 21-19 असा विजय मिळवला. बुधवारी सिंधूने सायाका ताकाहाशीवर अटीतटीच्या लढतीत 21-17, 7-21, 21-13 असा विजय मिळवला होता.
पुरुषांमध्ये सातव्या मानांकित श्रीकांतने एकेरीच्या लढतीत व्हिन्सेंट की विंग वाँगवर 36 मिनिटांमध्ये विजय मिळवला. श्रीकांतने गुरुवारी वाँगवर 21-15, 21-14 अशी मात केली आणि पुढच्या फेरीत प्रवेश केला.
श्रीकांतला विजय मिळवता आला असला तरी प्रणॉयला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या अँथोनी सिनीसुकाने प्रणॉयला 21-14, 21-17 असे पराभूत केले.