Japan Open badminton : मनु अत्री- सुमिथ रेड्डी जोडीचा ऑलिम्पिक पदक विजेत्यांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 02:29 PM2018-09-12T14:29:40+5:302018-09-12T14:29:56+5:30
Japan Open badminton: भारताची पुरुष दुहेरीची जोडी मनु अत्री आणि बी. सुमिथ रेड्डी यांनी जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मलेशियाच्या जोडीवर दणदणीत विजय मिळवला.
टोकियो, जपान ओपन बॅडमिंटनः भारताची पुरुष दुहेरीची जोडी मनु अत्री आणि बी. सुमिथ रेड्डी यांनी जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मलेशियाच्या जोडीवर दणदणीत विजय मिळवला. भारतीय जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या गोह व्ही शेम आणि टॅन वी किओंग यांचा 15-21, 23-21, 21-19 असा 54 मिनिटांच्या संघर्षात पराभव केला. मनु आणि सुमिथ रेड्डी या जोडीला उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हे जिटिंग आमि टॅन क्विअँग यांचा सामना करावा लागणार आहे.
ATTRI Manu/REDDY B. Sumeeth pair scored superb victory over GOH V Shem/TAN Wee Kiong 15-21,23-21,21-19 to reach 2nd round of men's doubles category at #JapanOpenSuper750pic.twitter.com/0cUAROLViG
— Finishing touch (@tanmoy_sports) September 12, 2018
पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या लढतीत सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला, तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले. राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सात्विक आणि चिराग या जोडीला जपानच्या तकेशी कमुरा व कैगो सोनोडा यांच्याकडून 12-21, 17-21 अशी हार मानावी लागली. महिला दुहेरीत कोरियाच्या चँग ये ना आणि जुंग क्यूंग एयून यांनी भारताच्या अश्विनी व सिक्की यांना 21-17, 21-13 असे पराभूत केले.
You guys are just amazing! @AtriManu@buss_reddy Defeating Goh/Tan (Olympic Silver Medallist) in R32 of #JapanOpenSuper750 was not easy! 15-21 23-21 21-19! Keep the spirit!!!
— Badminton Addict (@bad_critic346) September 12, 2018