जपान ओपन - सिंधू ,सायनाचा पराभव; श्रीकांत आणि प्रणय उपांत्यपूर्वफेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 04:57 PM2017-09-21T16:57:15+5:302017-09-21T16:58:01+5:30
आठवडाभरानंतर कोर्टवर परतलेले सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूचा जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत पराभवाला सामोर जाव लागले आहे. तर भारताच्याच श्रीकांत आणि प्रणय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवत भारताच्या आशा जिंवत ठेवल्या आहेत.
टोकिओ, दि. 21 - आठवडाभरानंतर कोर्टवर परतलेले सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूचा जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत पराभवाला सामोर जाव लागले आहे. तर भारताच्याच श्रीकांत आणि प्रणय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवत भारताच्या आशा जिंवत ठेवल्या आहेत.
जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहारानं 18-21 आणि 8-21 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेतील पराभवाची परतफेड केली. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पी़ व्ही. सिंधूने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करुन पहिल्या फेरीत जपानच्या मिनात्सु मितानीचा १२-२१, २१-१५, २१-१७ गुणांनी पराभव केला़ होता.
विश्व चॅम्पियनशिपचे कांस्य जिंकणा-या सायना नेहवालनं स्पेनची कॅरोलिना मारीनबरोबर झालेल्या लढतीत 14-10नं आघाडी घेतली होती. पण मारीनने निर्णायक क्षणी आपला खेळ उंचावत सायनाचा 16-21 आणि 13-21 असा पराभव केला. सायनाने जांघेतील मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे कोरिया ओपनमध्ये भाग घेतला नव्हता. तिने बुधवारी पहिल्या सामन्यात थायलंडची पोर्नपावी चोचुवोंग हिचा ३९ मिनिटांत २१-१७, २१-९ ने पराभव केला होता.
किदाम्बी श्रीकांत आणि प्रणय यांनी 325,000 डॉलर पारितेषिकाच्या या स्पर्धेत उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया ओपन विजेता श्रीकांत याने दुसऱ्या फेरीत हाँगकाँगचा हू यूनचा पराभव केला. जागतिग मानंकनांत आठव्या स्छानावर असलेल्या श्रीकांतनं हू यूनचा 21-12, 21-11 असा पराभव करत अंतिम आठ खेळाडूमध्ये स्थान मिळवले आहे. श्रीकांतची उपांत्यपूर्वफेरीतील लढच डेनमार्कच्या विक्टर एक्सेलसन याच्याशी होणार आहे.
अमेरिकन ओपन ग्रॅण्डप्रिक्स चॅम्पियन एच. एस. प्रणय याने पुरुष एकेरीत चीनच्या तायपे के सु जेन याचा 21-16, 23-21 असा पराभऴ करत पुढील फेरीत प्रवेश केला. त्याचा पुढील सामना जागतिक मानंकनांत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या शी युकी याच्याशी होणार आहे.