मलेशिया मास्टर्स; सिंधू, सायनाचे आव्हान संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 03:18 AM2020-01-11T03:18:46+5:302020-01-11T03:19:27+5:30
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला शुक्रवारी दुहेरी धक्का बसला.
क्वालालम्पूर : मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला शुक्रवारी दुहेरी धक्का बसला. स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या दोघींचेही आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. सायनाला आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनच्या कॅरोलिन मरिनने धूळ चारली, तर सिंधूला ताई झू यिंग हिने मात दिली.
सायना नेहवालला कॅरोलिनने ८-२१, ७-२१ असे मोठ्या फरकाने पराभूत केले. सायना पहिल्याच गेमपासून अत्यंत हतबल दिसत होती. पहिला गेम ८-२१ असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये तरी सायनाकडून प्रतिकार पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. सायनाला मात्र फारसा प्रहार करणे जमले नाही. मरिनने दुसरा गेम ७-२१ असा जिंकून सामना सहजपणे जिंकला. यासह सायना-मारिन यांचा जयपराजयाचा रेकॉर्ड ६-६ असा झाला.
दुसरीकडे, सिंधूकडून बºयाच अपेक्षा होत्या. मात्र सिंधूनेही चाहत्यांची निराशा केली. सिंधूपुढे तैवानच्या ताई झू यिंग हिचे आव्हान होते. यिंगने सिंधूवर २१-१६, २१-१६ अशा सरळ दोन गेममध्ये मात केली. दोन्ही गेममध्ये सिंधूने चांगला प्रतिकार केला. पण तिला सामना जिंकणे शक्य झाले नाही. यासह यिंगचा सिंधूवर विजयाचा रेकॉर्ड १२-५
असा झाला. मागच्या वर्षी
आॅक्टोबर महिन्यात फ्रेंच ओपनमध्ये पराभवाचा धक्का बसल्यानंतर सिंधू यिनगकडून सलग दुसऱ्यांचा पराभूत झाली आहे. (वृत्तसंस्था)