Malaysian Open Badminton: दडपणासमोर पुन्हा हरली सिंधू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 20:12 IST2018-06-30T20:03:09+5:302018-06-30T20:12:15+5:30
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कडव्या संघर्षानंतर पराभव पत्करावा लागला. पुरूष एकेरीत श्रीकांत किदम्बीलाही पराभव पत्करावा लागल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

Malaysian Open Badminton: दडपणासमोर पुन्हा हरली सिंधू
क्वालालंपूर - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कडव्या संघर्षानंतर पराभव पत्करावा लागला. पुन्हा एकदा दडपणामुऴे सिंधूला हार पत्करावी लागली. महत्वाच्या लढतीत सामना तिस-या गेमपर्यंत गेल्यास सिंधू प्रचंड ताण घेते आणि त्याचा तिच्या खेऴावर परिणाम होतो. याचीच प्रचिती मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आली. तिच्यासह पुरूष एकेरीत श्रीकांत किदम्बीलाही पराभव पत्करावा लागल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
चायनिज तैपेईच्या ताय झु यिंगविरूद्घ सिंधूला नेहमी झगडावे लागते. जय-पराजयाच्या आकडेवारीत यिंग 9-3 अशी आघाडीवर आहे आणि सामना तिस-या गेममध्ये गेल्यावर सिंधू निष्प्रभ होते, ही चाल यिंग ओऴखून आहे. तिस-या गेममध्ये यिंगने हीच संधी हेरून विजय निश्चित केला. सिंधूने 0-1 अशा पिछाडीवरून मुसंडी मारली, परंतु तिला तो संघर्ष कायम राखण्यात अपयश आले. यिंगने 21-15, 19-21, 21-11 असा विजय मिऴवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
Malaysian Open: Olympic Silver medalist @Pvsindhu1 put up a great fight!
— BAI Media (@BAI_Media) June 30, 2018
Tough luck,lost the match 15-21;21-19;11-21 & with her exit the Indian challenge at the Malaysian Open is over. We wish all the fellow players best of luck for their finals. #IndiaontheRise#BestofBadmintonpic.twitter.com/Mk8IC6Mmvn
पुरूष एकेरीत एकमेव आशास्तान असलेल्या श्रीकांतलाही उपांत्य फेरीचा अडथऴा पार करता आला नाही. जपानच्या केंटो मोमोटाने 21-13, 21-13 अशी सहज बाजी मारली.
Malaysian Open: Hard luck Champ!🏸🇮🇳💪@srikidambi loses to @KentoMomotaFC 12-21;13-21. You will be back winning soon. best of luck for the next tournament.#BestofBadminton#IndiaontheRisepic.twitter.com/vIl0CxkiJz
— BAI Media (@BAI_Media) June 30, 2018