राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीनंतरही निवड नाही- प्राजक्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 07:01 PM2018-01-08T19:01:54+5:302018-01-08T19:02:11+5:30
भारतीय संघातून खेळण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धांत खेळणे गरजेचे आहे. मात्र राष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतरही भारतीय संघात निवड झालेली नसल्याची खंत बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंत हिने बोलून दाखवली.
- आकाश नेवे
चेन्नई - भारतीय संघातून खेळण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धांत खेळणे गरजेचे आहे. मात्र राष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतरही भारतीय संघात निवड झालेली नसल्याची खंत बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंत हिने बोलून दाखवली. प्रीमियर बॅडमिंटन लीगसाठी चेन्नईत आलेली प्राजक्ता सावंत हिने यावेळी लोकमतशी संवाद साधला.
प्रश्न- तू आणि चेल यांना शुक्रवारी झालेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्याबद्दल काय सांगशील
प्राजक्ता- मुळात चेल याचे आधीच सामने झाले होते त्यामुळे तो खुपच थकला होता. आणि मी देखील त्याला हवी तशी साथ देऊ शकले नाही. काही वेळा आम्ही गुण गमावले चुकांचा फटका बसला. त्यामुळे नॉर्थ ईस्ट वॉरीयर्सला पराभव पत्करावा लागला.
प्रश्न- तू सध्या मलेशियात क्लबकडून खेळते आणि राष्ट्रीय स्पर्धेतही चमकते. त्याबद्दल काय सांगशील.
प्राजक्ता - मी सध्या मलेशियातील क्लबकडून खेळते. योगेंदर कृष्णन, मनोज कुमार आणि कसीन हे या क्लबसोबत आहे. मी पटना येथील राष्ट्रीय स्पर्धेत मी विजेतेपदही पटकावले होते मात्र तरीही माझी निवड झाली नाही. मला इंडियन सर्किटमध्ये खेळायला आवडेल. या आधी माझा बॅडमिंटन संघटनेबरोबर वाद झाला होता.
प्रश्न - व्यावसायिक बॅडमिंटन स्पर्धांत खेळताना नेमके काय वाटते.
प्राजक्ता- मी प्रत्येक स्पर्धेत स्वतःसाठीच खेळते. पीबीएल सारख्या स्पर्धेत अनेक देशांचे खेळाडू एकत्र येतात. त्यामुळे या स्पर्धांत खेळते