कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: पी. कश्यप उपांत्य फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 01:57 AM2019-09-28T01:57:15+5:302019-09-28T07:01:58+5:30
डेन्मार्कच्या जॉन ओ जोर्गेन्सनवर सरळ गेममध्ये मात
इंचियोन : भारताचा स्टार खेळाडू पी. कश्यपने शुक्रवारी डेन्मार्कच्या जॉन ओ जोर्गेन्सनवर सरळ गेममध्ये मात करीत कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
हैदराबादचा ३३ वर्षीय कश्यपने जागतिक क्रमवारीत एकेकाळी दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या जोर्गेन्सनला ३७ मिनिटात २४-२२, २१-८ असा धक्का देत उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेतील आव्हान कायम राखलेला कश्यप एकमेव भारतीय खेळाडू आहे.
कश्यपपुढे शनिवारी उपांत्य सामन्यात जपानचा दोन वेळेचा विश्व चॅम्पियन व जागतिक क्रमवारीतील अव्वल केंटो मोमोटाचे तगडे आव्हान असेल. विश्व क्रमवारीत सहाव्या स्थानावरील कश्यपने डेन्मार्क ओपनमध्ये ५ वर्षांआधी जोर्गेन्सनचा सामना केला होता. शुक्रवारच्या सामन्यापर्यंत उभय खेळाडूंमधील रेकॉर्ड २-४ असा होता.
पहिल्या गेममध्ये दोघांनी लहान-लहान रॅलिज केल्या. कश्यप ब्रेकपर्यंत ८-११ असा पिछाडीवर होता. ब्रेकनंतर त्याने वेगाने गुण मिळले. १४-१४, १८-१८,१९-१९ अशा बरोबरीनंतर कश्यपने मोक्याच्यावेळी खेळ उंचावत गेम पॉईंट मिळविला. दुसºया गेममध्ये एकतर्फी वर्चस्व राखत कश्यपने बाजी मारली.