पी. व्ही. सिंधूने स्विकारली उप जिल्हाधिकारी पदाची सुत्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 01:11 PM2017-08-10T13:11:19+5:302017-08-10T14:08:30+5:30

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने आंध्र प्रदेश सरकाने दिलेल्या सरकारी नोकरीचा स्वीकार केला आहे.

P. V. Sindhu accepted the post of Deputy Collector | पी. व्ही. सिंधूने स्विकारली उप जिल्हाधिकारी पदाची सुत्रे

पी. व्ही. सिंधूने स्विकारली उप जिल्हाधिकारी पदाची सुत्रे

Next

अमरावती, दि. 10 - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने आंध्र प्रदेश सरकाने दिलेल्या सरकारी नोकरीचा स्वीकार केला आहे. आंध्रप्रदेश सरकाराने उप जिल्हाधिकारी पदाची सिंधूला ऑफर दिली होती.  सिंधूनं आंध्र प्रदेशच्या गोलापुडी जिल्ह्याची उपजिल्हाधिकारी म्हणून सूत्रं हातात घेतली आहेत. पदभार स्वीकारला त्यावेळी सिंधूसोबत तिचे आईवडील उपस्थित होते. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी २९ जुलैला सिंधूला नियुक्ती पत्र दिले होते. राज्य सरकारने ३० दिवसांच्या आत सिंधूला उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची अट घातली होती.

21 वर्षीय सिंधू 2013 पासून भारत पेट्रोलियम बरोबर काम करत असून असिस्टंट मॅनेजर (स्पोर्ट्स) पदावर हैद्राबाद येथे कार्यरत आहे. कारणाम मल्लेश्वरी, मेरी कॉम, साईना नेहवाल आणि साक्षी मलिक नंतर सिंधू हि फक्त पाचवी भारतीय महिला खेळाडू आहे जिने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. ऑलिम्पिक रौप्य पदकानंतर सिंधूवर बक्षिसांची खैरात झाली होती. तेलंगणा सरकारने 5 कोटी तर आंध्र सरकारने 3 कोटी बक्षीस म्हणून सिंधूला दिले होते. त्याचवेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबा नायडू यांनी तिला क्लास 1 दर्जाची नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. आणि आज तिने ह्या ऑफरचा स्वीकार केला होता.

Web Title: P. V. Sindhu accepted the post of Deputy Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.