पी. व्ही. सिंधू - कॅरोलिन मारिन पुन्हा आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 09:19 PM2018-06-28T21:19:08+5:302018-06-28T21:19:46+5:30
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या अंतिम फेरीचा थरार पुन्हा अनुभवण्याची संधी भारतीयांना मिऴणार आहे. मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेत भारताची पी. व्ही. सिंधू आणि स्पेनची कॅरोलिन मारिन या दोन कट्टर प्रतिस्पर्धी उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने येणार आहेत.
Next
ठळक मुद्देरिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या अंतिम फेरीचा थरार पुन्हा अनुभवण्याची संधी भारतीयांना मिऴणार आहे.
क्वालालंपूर - रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या अंतिम फेरीचा थरार पुन्हा अनुभवण्याची संधी भारतीयांना मिऴणार आहे. मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेत भारताची पी. व्ही. सिंधू आणि स्पेनची कॅरोलिन मारिन या दोन कट्टर प्रतिस्पर्धी उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने येणार आहेत.
Malaysian Open: Third seed @Pvsindhu1 is through to the last 8, trouncing Ying Ying Lee 21-8; 21-14. She will play @CarolinaMarin in the quarter final and that will be a match to watch, what says friends! #IndiaontheRisepic.twitter.com/eNzccuZ6DO
— BAI Media (@BAI_Media) June 28, 2018
तिस-या मानांकित सिंधूने उपउपांत्य फेरीत मलेशियाच्या यिंग यिंग ली हीचा 21-8, 21-14 असा सरऴ गेममध्ये पराभव केला. सिंधूने अवघ्या 32 मिनिटांत ही लढत जिंकली. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूसमोर मारिनचे आव्हान आहे. या स्पर्धेत सायना नेहवालच्या पराभवानंतर भारतीयांच्या अपेक्षा सिंधूवरच आहेत. जय-पराजयाच्या आकडेवारीत मारिन 6-5 अशी आघाडीवर आहे.