परभणी : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:39 AM2019-07-01T00:39:34+5:302019-07-01T00:39:40+5:30
तालुक्यातील अनेक भागात जून महिन्यांच्या प्रारंभी वाळदी वारे आणि आवकाळी पावसाने फळबागांचे नुकसान झाले़ मात्र आदेश देऊनही नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत. या संदर्भात २९ जून रोजी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): तालुक्यातील अनेक भागात जून महिन्यांच्या प्रारंभी वाळदी वारे आणि आवकाळी पावसाने फळबागांचे नुकसान झाले़ मात्र आदेश देऊनही नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत. या संदर्भात २९ जून रोजी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे़
पाथरी तालुक्यात यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच वादळी वारे व आवकाळी पाऊस झाला़ यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झले़ लोणी बु़ व इतर गावातील शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याची मागणी केली होती़ तालुक्यातील नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १३ जून रोजी देण्यात आले होते़ पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पथकाची स्थापना करण्यात आली होती़ मात्र अद्यापही पंचनामे करण्यात आलेल नाहीत़ त्यामुळे तालुक्यातील नुकसान झालेल्या बागायती पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी लोणी बु़ येथील शेतकºयांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे़
निवेदनावर बाळासाहेब फुके, प्रल्हाद धर्मे, विठ्ठल काळे, भागवत सौंदर्य, लिंबाजी कोरडे, रघुनाथ शिंदे यांच्या स्वाक्षºया आहेत़