राष्ट्रीय सिनियर बॅडमिंटन स्पर्धेत पेट्रोलियम संघाची जेतेपदाची ‘हॅट्ट्रिक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:50 AM2017-11-04T00:50:19+5:302017-11-04T00:50:30+5:30
पेट्रोलियम क्रीडा संवर्धन मंडळ (पीएसपीबी) संघाने सलग तिस-या वर्षी जेतेपदाचा मान कायम राखताना शुक्रवारी ८२ व्या राष्ट्रीय सिनियर बॅडमिंटन स्पर्धेत सांघिक (७३ वी आंतरराज्य स्पर्धा) गटाच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशवर ३-० ने सहज विजय नोंदविला.
नागपूर : पेट्रोलियम क्रीडा संवर्धन मंडळ (पीएसपीबी) संघाने सलग तिस-या वर्षी जेतेपदाचा मान कायम राखताना शुक्रवारी ८२ व्या राष्ट्रीय सिनियर बॅडमिंटन स्पर्धेत सांघिक (७३ वी आंतरराज्य स्पर्धा) गटाच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशवर ३-० ने सहज विजय नोंदविला.
कोराडी रोडवरील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित या स्पर्धेच्या दुस-या दिवशी स्टार आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या पीएसपीबीने ओळीने सामने जिंकून ‘हॅट्ट्रिक’ साधली, चंदीगड आणि पटणा येथील राष्ट्रीय स्पर्धेतही पीएसपीबी संघ विजेता होता.
भारतीय खेळाडूंमध्ये चौथे रँंकिंग असलेल्या श्रेयांशीने जी. ऋत्त्विका शिवानीला कडवे आव्हान दिले. शिवानीने पहिला गेम २१-११ ने जिंकला. दुसºया गेममध्ये संघर्ष करणाºया श्रेयांशीने २१-१९ अशी बाजी मारुन लढत बरोबरीत आणली. हैदराबाद येथील गोपीचंद अकादमीत एकत्र सराव करणाºया या दोघींना परस्परांच्या उणिवा - बलस्थाने माहीत होती. निर्णायक गेममध्ये चुरस गाजली.एकवेळ १९-१८ असे गुण झाले. त्याचवेळी शिवानीने सलग दोन गुणांची कमाई करीत श्रीयांशीचा २१-१८ असा पाडाव केला. मिश्र गटाच्या पहिल्या सामन्यात प्रणव जेरी चोप्रा- एन. सिक्की रेड्डी यांनी श्रेयांशी परदेसी- पीयूष बोबडे या मध्य प्रदेशच्या जोडीला २१-११, २१-१२ ने नमवले.