प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत दाखल, किदाम्बी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:41 AM2018-03-17T01:41:43+5:302018-03-17T01:41:43+5:30

पायांच्या जखमांतून सावरत पुनरागमन करणाऱ्या भारताच्या एच.एस. प्रणॉय याने आॅल इंग्लंडचॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

Prannoy entered the quarter-finals, concluding the challenge of Kidambi Srikkanth | प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत दाखल, किदाम्बी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत दाखल, किदाम्बी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

Next

बर्मिंघम : पायांच्या जखमांतून सावरत पुनरागमन करणाऱ्या भारताच्या एच.एस. प्रणॉय याने आॅल इंग्लंडचॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. दुसरीकडे, भारतीयांच्या नजरा असलेल्या किदाम्बी श्रीकांतला मात्र पराभवाचा झटका बसला. चीनच्या हुआंग युजियांगकडून पराभूत झाल्याने तो स्पर्धेबाहेर पडला. त्यामुळे भारताच्या आशा आता प्रणॉय आणि सिंधू यांच्यावर असतील.
बिनमानांकित प्रणॉयने माजी नंबर तीनचा खेळाडू आणि २०१४ च्या विश्व चॅम्पियनशीपचा कांस्यपदक विजेत्या इंडोनेशियाच्या टामी सुगियातो याचा उपउपांत्यपूर्व फेरीत २१-१०, २१-१९ ने पराभव केला. सुरुवातीला तो काही स्पर्धांना मुकला होता. ज्यामुळे जागतिक क्रमवारीत त्याची १६ व्या स्थानी घसरण झाली होती. प्रणॉयने शानदार पुनरागमन केले. आता उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना युजियांगविरुद्ध होईल.
दुहेरीत, भारताची सत्विक साईराज-चिराग शेट्टी ही जोडी एक तास तीन मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभूत झाली. माथियास बो-कार्स्टन मोगेनसन या दुसºया मानांकित जोडीने त्यांचा २१-१६, १६-२१ आणि २३-२१ ने पराभव केला. आॅलिम्पिक रौप्य विजेती पी. व्ही. सिंधूने सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हायव्होल्टेज सामन्यात जपानच्या सातव्या मानांकित नोजोमी ओकूहाराविरुद्ध बाजी मारली. (वृत्तसंस्था)
>दुहेरीतही पंचांच्या कामगिरीवर नाराजी
भारताच्या साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीला माथियास-कार्स्टन या जोडीचा पराभव करण्याची संधी होती. ते उलटफेर करण्याच्या तयारीत होते. मात्र, मोक्याच्या क्षणी त्यांना सर्व्हिस फॉल्ट देण्यात आले. त्यामुळे त्यांना एक तास तीन मिनिटांत पराभव पत्करावा लागला.यावर चिरागनेही नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, हे दुदैवी असेच आहे. आम्हाला तिसºया गेमच्या शेवटी प्रत्येक २-३ गुणांवर सर्व्हिस फॉल्ट मिळाला.
स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने दिमाखदार कामगिरी करताना जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचे तगडे आव्हान परतावून उपांत्य फेरीत धडक मारली. तीन गेमपर्यंत रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात सिंधूने झुंजार खेळ करताना २०-२२, २१-१८, २१-१८ अशी बाजी मारली.
>श्रीकांत पंचांवर नाराज
भारतीय स्टार शटलर किदाम्बी श्रीकांत स्पर्धेतून बाहेर पडला. मात्र, पराभवानंतर त्याने पंचांनी दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, ‘पंचांकडून सलग सर्व्हिसबाबत झालेल्या चुका हास्यास्पद आहेत.’
‘सर्व्हिस फॉल्ट’ निर्णयावर तो नाराज आहे. सुरुवातीला सर्व्हिसच्या खूप चुका होत्या.
मला आशा नव्हती. काल मी एकही चूक केली नाही. आज मात्र स्थिती पूर्णपणे बदलली. स्पर्धेत असे होऊ नये. यासाठी काही विशेष नियम असणे आवश्यक आहे. पंचांना काल काहीच चुका दिसल्या नाहीत. आज मात्र त्यांना खूप चुका सापडल्या. हे हास्यास्पद आहे, असे श्रीकांतने सांगितले.

Web Title: Prannoy entered the quarter-finals, concluding the challenge of Kidambi Srikkanth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.