प्रीमीयर बॅॅडमिंटन लीग: सिंधू-सायनाच्या लढतीची उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:50 IST2017-12-23T01:50:27+5:302017-12-23T01:50:41+5:30
बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशीपचची रौप्य पदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि कांस्य पदक विजेती खेळाडू सायना नेहवाल यांचे संघ शनिवारपासून सुरू होत असलेल्या प्रीमीयर बॅॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) तिस-या सत्रात आमने सामने येतील. या दोन दिग्गजांमध्ये रगणा-या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे.

प्रीमीयर बॅॅडमिंटन लीग: सिंधू-सायनाच्या लढतीची उत्सुकता
गुवाहाटी : बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशीपचची रौप्य पदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि कांस्य पदक विजेती खेळाडू सायना नेहवाल यांचे संघ शनिवारपासून सुरू होत असलेल्या प्रीमीयर बॅॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) तिस-या सत्रात आमने सामने येतील. या दोन दिग्गजांमध्ये रंगणा-या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे.
नबीनचंद्र बोर्डोलोई इनडोअर स्टेडिअममध्ये होणाºया या सामन्यात सिंधूच्या नेतृत्वात चेन्नई स्मॅशर्स संघ गत विजेत्या सायना नेहवालच्या अवध वॉरीयर्सविरुद्ध लढेल. सायनासोबत नुकत्याच झालेल्या सामन्यात तीचे रेकॉर्ड २ -१ असे राहिले आहे. गेल्या महिन्यात सायना वि. सिंधू लढत राष्ट्रीय अजिंक्यपदच्या अंतिम फेरीत झाला होता. त्यात सायनाने विजय मिळवला होता.
लीगमध्ये सयना व सिंधू यांच्यात फक्त वैयक्तिक स्पर्धा होणार नाही. तर त्यांच्यावर आपल्या संघांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आहे.
सायनाने सांगितले की, २३ दिवसांत जबरदस्त लढती होणार आहे. सध्या त्यावरच लक्ष आहे.’ सिंधूने म्हटले की, ‘आम्ही अवध वॉरीयर्ससोबत होत असलेल्या पहिल्या सामन्याबाबत उत्सुक आहोत. यात फक्त माझा आणि सायना यांचा सामना होणार नाही तर अनेक चांगले सामने होतील.’ (वृत्तसंस्था)