Corona Virus : ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूची दोन राज्यांना आर्थिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 03:06 PM2020-03-26T15:06:21+5:302020-03-26T15:07:09+5:30
कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक खेळाडू पुढे येत आहे. पण, यात क्रिकेटपटू कुठे आहेत?
कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक खेळाडू पुढे येत आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया, माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली, गौतम गंभीर यांच्यानंतर आता ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिनेही मदतीचा हात पुढे केला आहे. सिंधूनं कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तिनं आंध्र प्रदेश व तेलंगणा मुख्यमंत्री मदतनिधीत ही रक्कम जमा केली आहे.
I hereby donate an amount of Rs 5,00,000/- each (Rs five lakhs ) towards the "Chief Ministers Relief Fund"
— Pvsindhu (@Pvsindhu1) March 26, 2020
for the States of Telangana and Andhra Pradesh to fight against COVID-19. @TelanganaCMO@AndhraPradeshCM
यापूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यानं दोन कोटींची मदत केली होती. कल्याणने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांच्या मुख्यमंत्री निधीत प्रत्येकी 50 लाख, तर पंतप्रधान निधीत 1 कोटींची मदत केली आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं पश्चिम बंगाल सरकारला 50 लाख किमतीचे तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून ते अन्न गरजूपर्यंत पोहोचेल. भारताचा माजी सलामीवर गंभीरनंही त्याच्या खासदारकी निधीतून दिल्ली सरकारला 50 लाख रुपये दिले.
टेनिस स्टार सानिया मिर्झानेही रोजंदारी कामगारांना अन्न आणि मुलभूत वस्तू देण्याचा निर्धार केला. कुस्तीपटू बजरंग पुनियानेही त्याचा सहा महिन्याचा पगार हरयाणा सरकारला दिला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 50 लाख देण्याचा निर्णय घेतला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मोठ्या मनाचा माणूस; दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर अन् त्याच्या पत्नीची कोट्यवधींची मदत
Shocking : आफ्रिकेच्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू
क्रीडा विश्व धावलं मदतीला, पण क्रिकेटचा देव अन् कॅप्टन कोहली करताहेत फक्त आवाहन!
श्रीलंका, बांगलादेश अन् आता पाकिस्तान क्रिकेट मंडळानंही दिला मदतीचा हात; BCCI पुढाकार कधी घेणार?
Video : शोएब अख्तर देतोय कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी बाबा रामदेव यांच्या टिप्स