रितिका, मृण्मयी तिस-या फेरीत; अव्वल मानांकित रिया पिल्लईचा धक्कादायक पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 03:33 AM2017-11-05T03:33:30+5:302017-11-05T03:33:38+5:30
निक प्रतिभावान महिला खेळाडूंनी चमकदार खेळ करीत कोराडी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ८२ व्या सिनियर राष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेची शनिवारी पुढील फेरी गाठली.
नागपूर : स्थानिक प्रतिभावान महिला खेळाडूंनी चमकदार खेळ करीत कोराडी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ८२ व्या सिनियर राष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेची शनिवारी पुढील फेरी गाठली.
लक्षवेधी ठरलेल्या लढतीत प्राशी जोशी हिने अव्वल मानांकित मुंबईची रिया पिल्लई हिला २१-१८, २१-११ ने पराभवाचा धक्का दिला. महिला एकेरीत रितिका, राशी लांबे आणि मृण्मयी सावजी यांनी तिसºया फेरीत धडक दिली. रितिकाने मेहरिन रिझा हिच्यावर २१-१३, २१-१९ ने सहज विजयाची नोंद केली. राशीने अंगिता नोरेमवर २१-१४, २१-१० ने विजय साजरा केला. मृण्मयीने अक्षया अरमुगमचा २१-९, २१-११ असा पराभव केला. मालविकाने इशिका मानचंदर हिचा २१-१७, २१-१२ ने पराभव केला.
महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत मृण्मयी सावजी- मानसी गाडगीळ जोडीने ब्रनाली कोंवर-अंकिता राजकोवा जोडीवर २१-१४, २१-१० ने विजय नोंदविला. रितिकाने मुंबईची सहकारी सिमरन सिंघी हिच्या सोबतीने निर्मला- आरजू ठाकूर यांच्यावर विजय नोंदविला. रोहन गुरबानी याने भास्कर चक्रवर्तीवर २१-१४, २१-१७ ने विजय साजरा केला पण सारंग लखानीला के. ए. वॉल्टरकडून १९-२१,१८-२१ ने पराभवाचा धक्का बसला. गौरव रेगे हा देखील अभिमन्यूसिंग याच्याकडून २१-१९,१४-२१,११-२१ ने पराभूत झाला.
अनुभवी अरुंधती पानतावणे- अनुष्का यांनी रिंझुआली- एच, पी, लाल या जोडीचा २१-९, २१-१३ ने पराभव केला. पुरुष दुहेरीत सौरभ केºहळकर आणि त्याचा सहकारी दीप रंभिया यांनी के. कार्तिकेय- व्यंकटेश प्रसाद या जोडीवर २१-१०, २१-१० अशी सरळ गेममध्ये मात केली.