प्रणयचा सलग दहावा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 02:03 AM2018-01-03T02:03:07+5:302018-01-03T02:03:34+5:30

एच. एस. प्रणय याने बॅडमिंटन लीगच्या लढतीत देशातील आघाडीचा पुरुष एकेरी खेळाडू किदाम्बी श्रीकांत याला पराभूत करत स्पर्धेतील सलग दहावा विजय नोंदविला.

 Running for the 10th consecutive victory | प्रणयचा सलग दहावा विजय

प्रणयचा सलग दहावा विजय

Next

लखनौ : एच. एस. प्रणय याने बॅडमिंटन लीगच्या लढतीत देशातील आघाडीचा पुरुष एकेरी खेळाडू किदाम्बी श्रीकांत याला पराभूत करत स्पर्धेतील सलग दहावा विजय नोंदविला.
प्रणय याला या वर्षी झालेल्या लिलावात अहमदाबाद स्मॅश मास्टर्स संघाने ६२ लाख रुपयांत घेतले होते. त्याने श्रीकांतवर अत्यंत मोक्याच्या वेळी विजय मिळवला. अवध वॉरियर्सविरुद्ध अहमदाबाद या सामन्यात ०-३ ने मागे पडले असताना प्रणयने विजय मिळवत संघाला गुण मिळवून दिला. तर श्रीकांतचा या सत्रातील सलग दुसरा पराभव आहे. दुसरीकडे प्रणय दोन सत्रात अजेय आहे.
अवधसाठी पारुपल्ली कश्यप याने ट्रम्प सामन्यात सौरभ वर्माला १४-१५, १५-१२, १५-१४ असे पराभूत केले. त्याआधी मिश्र दुहेरीत क्रिस्टीना पेडरसन (डेन्मार्क) आणि तान चुन मान (हाँगकाँग) या जोडीने अहमदाबादच्या लॉ च्युक हिम आणि कॅमिला जुल याला जोडीला तीन गेमपर्यंत झालेल्या लढतीत १४-१५, १५-१२, १५-१४ असे पराभूत केले. पुरुष दुहेरीत अवध वॉरियर्सच्या मान आणि हेतियावान यांनी विजय मिळवला. या सामन्यात अवध वॉरियर्सने ४ -३ असा विजय मिळवला.

सायना नेहवाल पराभूत
अहमदाबादची ताय त्झु यिंग हिने अवध वॉरियर्सची स्टार खेळाडू सायना नेहवाल हिला १५-५, १५-१४ असे पराभूत केले. यिंग हिने पहिला गेम सहज जिंकला. दुसºया फेरीत सायनाने चांगला खेळ केला. मात्र मोक्याच्या वेळी आपला यिंग हिने आपला खेळ उंचावत विजय मिळवला.

Web Title:  Running for the 10th consecutive victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.