भविष्यात सायनाविरुद्ध विश्व चॅम्पियनशिपमध्ये अंतिम लढत रंगण्याची शक्यता - पी. व्ही. सिंधू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 04:06 AM2017-08-30T04:06:53+5:302017-08-30T04:08:06+5:30

अलीकडेच विश्व चॅम्पियनशिपच्या मॅरेथॉन फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रौप्यपदकावर समाधान मानाव्या लागलेल्या पी. व्ही. सिंधूच्या मते आता आंतरराष्ट्रीय सामने चुरशीचे झाले असून, त्यात मोठ्या रॅलींची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

Saina likely to face the final of the World Championship in the future - P V. Indus | भविष्यात सायनाविरुद्ध विश्व चॅम्पियनशिपमध्ये अंतिम लढत रंगण्याची शक्यता - पी. व्ही. सिंधू

भविष्यात सायनाविरुद्ध विश्व चॅम्पियनशिपमध्ये अंतिम लढत रंगण्याची शक्यता - पी. व्ही. सिंधू

Next

हैदराबाद : अलीकडेच विश्व चॅम्पियनशिपच्या मॅरेथॉन फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रौप्यपदकावर समाधान मानाव्या लागलेल्या पी. व्ही. सिंधूच्या मते आता आंतरराष्ट्रीय सामने चुरशीचे झाले असून, त्यात मोठ्या रॅलींची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
सिंधू आणि जपानची नोजोमी ओकुहारा यांच्यादरम्यान प्रदीर्घ रॅली रंगल्या. त्यात एक रॅली तर ७३ शॉटची होती. उभय खेळाडूंदरम्यान लढत १ तास ५० मिनिटे रंगली. त्यात भारतीय खेळाडूला थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मंगळवारी मायदेशी परतल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना सिंधू म्हणाली, ‘आता खेळ सोपा राहिलेला नाही. कारण महिला एकेरी, पुरुष एकेरी आणि दुहेरीच्या लढतींमध्ये प्रदीर्घ रॅली रंगत असल्याचे निदर्शनास येते.’
हैदराबादच्या या २२ वर्षीय खेळाडूने २०१३ व २०१४ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते. सिंधू म्हणाली, ‘कुठल्याही खेळाडूला सहज गुण मिळवता येत नाही. प्रत्येक गुणासाठी संघर्ष करावा लागतो.’
रंगतदार अंतिम लढतीबाबत बोलताना सिंधू म्हणाली, ‘मानसिक व शारीरिकदृष्ट्या ही लढत थकविणारी होती; पण त्या वेळी केवळ गुण वसूल करण्याबाबत विचार सुरू असतो, कारण ही विश्व चॅम्पियनशिपची अंतिम लढत आहे. मी खेळत होते. माझ्याप्रमाणे तीसुद्धा थकलेली होती. ७३ शॉटची रॅली कुठल्याही लढतीत प्रथमच खेळली गेली असावी.’
सिंधू म्हणाली, ‘मी खूष आहे. रिओ आॅलिम्पिकनंतर ही सर्वोत्तम स्पर्धांपैकी एक आहे. विश्व चॅम्पियनशिप अन्य स्पर्धांच्या तुलनेत वेगळी असते. यापूर्वी मला दोनदा कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, पण या वेळी मी पदकाचा रंग बदलण्यात यशस्वी ठरले.’

भविष्यात माझ्या व सायनादरम्यान विश्व चॅम्पियनशिपची अंतिम लढत रंगण्याची शक्यता आहे. या वेळी हे घडले नाही; पण भविष्यात घडण्याची शक्यता आहे. विश्व चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी बराच वेळ मिळाला. आम्ही कसून मेहनत घेतली. आम्हाला स्पर्धेदरम्यान अधिक वेळ मिळत नाही. एक किंवा दोन आठवड्यांचा वेळ असतो. आम्ही स्पर्धेसाठी जातो आणि परत येतो. पण, या वेळी विश्व चॅम्पियनशिपपूर्वी किमान दोन महिन्यांचा कालावधी मिळाला. - पी. व्ही. सिंधू

Web Title: Saina likely to face the final of the World Championship in the future - P V. Indus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.