सायना नेहवाल ताइकडून पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:40 AM2018-01-29T01:40:28+5:302018-01-29T01:40:45+5:30
भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवालाला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तैवानच्या ताई जु यिनकडून अवघ्या २७ मिनिटांत सरळ दोन सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
जकार्ता - भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवालाला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तैवानच्या ताई जु यिनकडून अवघ्या २७ मिनिटांत सरळ दोन सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
एक वर्षानंतर दुखापतीनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या सायनाला एकतर्फी लढतीत ९-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. ताईकडून सायनाचा हा सलग सातवा पराभव आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ताईने लढतीच्या सुरुवातीपासून नियोजनबद्ध खेळ करीत गुणांमध्ये आघाडी घेतली. पहिल्या गेममध्ये जेव्हा ७-१२ असे गुण होते, तेव्हा या दोघींमध्ये ४३ शॉटची रॅली झाली. या वेळी सायनाने शटलबाहेर मारले आणि रॅली संपली. ताइने सायनाविरुद्ध पहिल्या गेमपासून गुणांमध्ये आघाडी ठेवली होती.
ताइने दोन्ही गेम सहज जिंकून सायनाला पराभूत केले. १२ व्या क्रमांकावर असलेल्या सायनाला ताइने गेल्या दहा लढतींमध्ये नऊ वेळा नमविले आहे.
२०११मध्ये सायनाने तैवानच्या या खेळाडूला पराभूत केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये सायनाने ताइविरुद्ध स्वीस ओपनमध्ये विजय नोंदविला होता.