भारतीय संघाची वाटचाल खडतर, सायना नेहवाल, एचएस प्रणॉयची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 03:34 AM2018-02-06T03:34:35+5:302018-02-06T03:34:44+5:30
दुखापतग्रस्त एचएस प्रणॉयची जाणवणारी अनुपस्थिती आणि स्टार खेळाडू सायना नेहवालने घेतलेली माघार यामुळे मंगळवारपासून सुरु होत असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचा प्रवास सोपा नसेल.
एलोर सेतार : दुखापतग्रस्त एचएस प्रणॉयची जाणवणारी अनुपस्थिती आणि स्टार खेळाडू सायना नेहवालने घेतलेली माघार यामुळे मंगळवारपासून सुरु होत असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचा प्रवास सोपा नसेल. या स्पर्धेत किदाम्बी भारताच्या पुरुषांचे, तर पीव्ही सिंधू महिला संघाचे नेतृत्त्व करणार आहे.
विशेष म्हणजे आशिया सांघिक अजिंक्यपद २० मे पासून बँकॉक येथे सुरु होणाºया थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेसाठी पात्रता फेरी असल्याने भारतासाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची ठरणार आहे. या स्पर्धेतील अव्वल चार संघ थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.
भारतीय पुरुष संघाचा ‘ड’ गटामध्ये समावेश असून यामध्ये फिलिपीन्स, मालदीव आणि इंडोनेशिया या मजबूत संघांचाही समावेश आहे. फिलिपीन्सविरुद्धच्या सामन्याने भारतीय पुरुषांच्या मोहिमेला सुरुवात होईल. दरम्यान, प्रणॉयच्या अनुपस्थितीमध्ये भारताला तीन एकेरीचे सामने जिंकवण्याची जबाबदारी किदाम्बीसह बी. साई प्रणीत आणि समीर वर्मा यांच्यावर असेल.
महिलांच्या संघामध्ये सायनाची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवेल. बर्मिंघम येथे १४ - १८ मार्च दरम्यान होणाºया आॅल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीसाठी सायनाने
माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकेरी लढतीमध्ये भारताची मदार सिंधू, युवा खेळाडू कृष्णा
प्रिया आणि रुत्विका गाडे
यांच्यावर असेल. ‘डब्ल्यू’ गटामध्ये समावेश असलेल्या भारतीयांना साखळी फेरीत जपान आणि हाँगकाँग यांच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. (वृत्तसंस्था)