सायना नेहवालची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 04:51 AM2019-11-26T04:51:45+5:302019-11-26T04:52:04+5:30
दुखापतीमुळे कामगिरीत सातत्य राखण्यात संघर्ष करीत असलेली भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मंगळवारपासून सुरु होत असलेल्या सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून अखेरच्या क्षणी माघार घेतली.
लखनौ : दुखापतीमुळे कामगिरीत सातत्य राखण्यात संघर्ष करीत असलेली भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मंगळवारपासून सुरु होत असलेल्या सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून अखेरच्या क्षणी माघार घेतली. आता सर्वांची नजर युवा लक्ष्य सेनवर केंद्रित झालेली असेल. तो मोसमातील पाचवे जेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील राहील.
तीनवेळची चॅम्पियन सायना यंदाच्या मोसमात आजारपण व दुखापतीमुळे संघर्ष करीत आहे. त्याचा प्रभाव तिच्या कामगिरीवर झाला. विश्व चॅम्पियन पी. व्ही. सिंधू या स्पर्धेत खेळणार नाही. सायनाने याआधीच प्रीमियर बॅडमिंटन लीगमधून (पीबीएल) माघार घेतली आहे. यंदा स्कॉटिश ओपन, सारलोरलक्स ओपन, डच ओपन व बेल्जियम इंटरनॅशनल स्पर्धा जिंकणारा लक्ष्य सुपर ३०० स्पर्धेच्या पहिल्या जेतेपदासाठी उत्सुक आहे. तो सलामीला फ्रान्सच्या थॉमस रौक्सेलविरुद्ध खेळेल. पुरुष दुहेरीत शानदार फॉर्मात असलेले सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी जेतेपदाचे प्रबळ दावेदार असतील. (वृत्तसंस्था)