सायना नेहवालचे लक्ष सुवर्णपदकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:58 AM2018-03-29T02:58:51+5:302018-03-29T02:58:51+5:30

दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत २०१० मध्ये सुवर्णपदकाची कामगिरीची पुनरावृत्ती गोल्डकोस्टमधील स्पर्धेत करण्याची सायना नेहवाल हिची इच्छा आहे.

Saina Nehwal's gold medal | सायना नेहवालचे लक्ष सुवर्णपदकावर

सायना नेहवालचे लक्ष सुवर्णपदकावर

googlenewsNext

नवी दिल्ली : दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत २०१० मध्ये सुवर्णपदकाची कामगिरीची पुनरावृत्ती गोल्डकोस्टमधील स्पर्धेत करण्याची सायना नेहवाल हिची इच्छा आहे.
आठ वर्षांपूर्वी सायना हिने अखेरच्या दिवशी सुवर्णपदकाची कमाई केली होती. या विजयाने ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला बनली. या पदकाने भारताने इंग्लंडला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले होते.
सायनाने सांगितले की, ‘भारत २०१० मध्ये पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. अखेरच्या दिवशी आमच्या नावावर ९९ पदक होते आणि भारतीय हॉकी आणि बॅडमिंटन महिला एकेरीचे सामने बाकी होते. मी सुवर्णपदक पटकावले आणि हॉकी संघाने रौप्यपदकाची कमाई केली. तिरंग्यासोबत पोडियमवर उभे राहणे खूपच चांगले होते. मी विसरुच शकत नाही.’
सायनाने २००६ मध्ये १५ वर्षे वयाची असताना राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक गटात पदार्पण केले आणि न्यूझीलंडच्या रेबेका बेलिगम हिला २१-१३,२४-२२ने पराभूत करत भारताला मिश्र गटात कांस्यपदक मिळवून दिले. तिने पुढे सांगितले की, ‘२००६ मध्ये मी पहिली राष्ट्रकुल खेळली होती. त्यावेळी आम्ही सांघिक गटात कांस्य पदक पटकावले होते. २०१४ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत दुखापतीमुळे सहभागी झाले नव्हते.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Saina Nehwal's gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.