ऑलिम्पिक प्रवेशासाठी खेळणार सायना, श्रीकांत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 04:44 AM2020-01-22T04:44:05+5:302020-01-22T04:44:52+5:30
अगामी टोकियो आॅलिम्पिक प्रवेश निश्चित करण्यासाठी भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत बुधवारपासून सुरु होणाऱ्या थायलंड मास्टर्स स्पर्धेत सहभागी होतील.
बॅँकॉक : अगामी टोकियो आॅलिम्पिक प्रवेश निश्चित करण्यासाठी भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत बुधवारपासून सुरु होणाऱ्या थायलंड मास्टर्स स्पर्धेत सहभागी होतील.
मागील वर्षी खराब फॉर्मशी झगडणाºया सायना व श्रीकांत यांचे रॅँकिंग सध्या अनुक्रमे २२ व २३ आहे. टोकिया आॅलिम्पिकमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांना आपले रॅँकिग १६ पर्यंत उंचवावे लागणार आहे. जागतिक विजेती पी. व्ही. सिंधू सहाव्या, बी. साईप्रणित ११ व्या, तर दुहेरीतील सात्विक रंकीरेड्डी व चिराग शेट्टी आठव्या स्थानी आहेत. या सर्वांचा आॅलिम्पिक प्रवेश जवळपास निश्चित आहे.
मागील वर्षी अनेक स्पर्धांमध्ये सुरुवातीलाच पराभूत झाल्यानंतर सायना व श्रीकांत यांनी आॅलिम्पिक पात्रतेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्री्रमियर लीगमधून माघार घेतली होती. श्रीकांतची सुरुवात चांगली झाली नव्हती. मलेशियातील पहिल्या सामन्यात चीनी तैपईच्या चोऊ तियेन चेन याच्याकडून त्याला पराभूत व्हावे लागले होते. आॅलिम्पिक पात्रता फेरीच्या अंतिम तारखेपूर्वी आठ स्पर्धा होणार आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये सायना व श्रीकांत यांना सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. (वृत्तसंस्था)