सर्व्हिस नियमांचा प्रयोग नको होता : सिंधू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:16 AM2017-12-27T00:16:27+5:302017-12-27T00:16:35+5:30
नवी दिल्ली : बॅडमिंटनमध्ये सर्व्हिसचा नवा नियम आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपऐवजी कुठल्या अन्य स्पर्धेपासून अमलात आणायला हवा होता, असे मत आॅलिम्पिक आणि विश्व स्पर्धेची रौप्यविजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली : बॅडमिंटनमध्ये सर्व्हिसचा नवा नियम आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपऐवजी कुठल्या अन्य स्पर्धेपासून अमलात आणायला हवा होता, असे मत आॅलिम्पिक आणि विश्व स्पर्धेची रौप्यविजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केले आहे. ‘आॅल इंग्लंड ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. या स्पर्धेऐवजी अन्य कुठल्या तरी स्पर्धेत नव्या नियमांचा प्रयोग करता आला असता. माझ्याबाबत बोलायचे झाल्यास मला नव्या नियमांपासून त्रास नाही. यासाठी केवळ सराव करण्याची गरज आहे,’ असे सिंधू म्हणाली.
नव्या नियमानुसार सर्व्हिस करणाºया खेळाडूला रॅकेटला शटल हिट करण्याआधी जमिनीपासून १.१५ मीटर उंचीपेक्षा शटल अधिक वर जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. पुढील वर्षीच्या आॅल इंग्लंड स्पर्धेत नव्या नियमांचा वापर होणार आहे. सायना नेहवाल आणि कॅरोलिना मरिनसारख्या दिग्गज खेळाडूंनी बॅडमिंटनच्या व्यस्त वेळापत्रकावर सडकून टीका केली. पण सिंधूच्या मते, बॅडमिंटनच्या व्यस्त वेळापत्रकावर टीका करण्यात अर्थ नाही.
विश्व बॅडमिंटन महासंघाने २०१८ च्या वेळापत्रकात आघाडीच्या खेळाडूंना वर्षभरात किमान १२ स्पर्धा खेळणे अनिवार्य केले आहे.
सहकारी खेळाडूंपेक्षा सिंधूचे विचार मात्र भिन्न आहेत. तिच्या मते बॅडमिंटन कॅलेंडरमध्ये टेनिस ग्रॅण्डस्लॅमसारखीच स्पर्धा असायला हवी. (वृत्तसंस्था)
>कॅलेंडर आधीच तयार झाले आहे. आम्ही खेळणार नाही, असे म्हणता येणार नाही. विश्वचॅम्पियनशिप, आशियाड, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पाठोपाठ होणार असल्याने व्यस्त वेळापत्रक आहे, पण मी स्पर्धांची निवड करेन आणि कोचसोबत योजना आखणार आहे.
-पी. व्ही. सिंधू