सिंधू ' असा ' केला आपला वाढदिवस साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 16:17 IST2018-07-05T16:16:43+5:302018-07-05T16:17:19+5:30
भारताला ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकवून देणाऱ्या पी.व्ही. सिंधूने आपला वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला.

सिंधू ' असा ' केला आपला वाढदिवस साजरा
जकार्ता : आपला वाढदिवस साजरा करण्याची प्रत्येकाची निराळी पद्धत असते. कुणी आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर दिवस व्यतित करण्याचा प्लॅन आखतो, तर कुणी आपल्या मित्रांबरोबर वाढदिवस साजरा करायला नयनरम्य ठिकाणी जातो. पण काहींच्या नशिबी या गोष्टी असतातच असं नाही, तर काहींना आपला वाढदिवस साजरा करण्याची यापेक्षाही चांगली संधी मिळते. भारताला ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकवून देणाऱ्या पी.व्ही. सिंधूने आपला वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला.
सिंधूचा आज २३वा वाढदिवस. पण हा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती भारतामध्ये नाही. त्यामुळे तिला आपल्या आप्तस्वकीयांबरोबर वाढदिवस साजरा करता येणार नाही. पण या वाढदिवशी तिच्या नशिबी एक चांगली गोष्ट लिहिलेली होती. आणि त्या गोष्टीमुळेच सिंधूचा वाढदिवस खास झाला.
सिंधू सध्या इंडोनेशियामध्ये जकार्ता बॅडमिंटन स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेत आज तिचा सामना होता तो जपानच्या आया ओहरीबरोबरी. या सामन्यात सिंधूने १७व्या मानांकित ओहोरीला २१-१७, २१-१४ असे सहज पराभूत केले आणि आपल्या वाढदिवसाला विजयाचे कोंदण लावले.