आजपासून रंगणार विश्व चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धा, सिंधूची नजर सुवर्णपदकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 04:42 AM2019-08-19T04:42:18+5:302019-08-19T04:42:35+5:30
World Badminton Championship 2019: पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत दुखापतीनंतर स्पर्धेेत सहभागी होईल. त्याने गेल्या २२ महिन्यात विश्व टूर मध्ये कोणतेही जेतेपद पटकावलेले नाही.
बासेल (स्वित्झर्लंड) : भारतासाठी दोन रौप्य पदक मिळणाऱ्या सिंधूचे लक्ष्य सोमवारपासून सुरु होणा-या बीडब्ल्यूएफ विश्व चॅम्पियनशिप बॅडमिंंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याकडे केंद्रीत झाले आहे. सिंधूने मागील काही वर्षांत या स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तिने दोन रौप्य व दोन कांस्यपदक मिळवली आहेत. मात्र आतापर्यंत तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आहे.
सिंधूला या स्पर्धेत दोन वेळा अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. २०१७ मध्ये ११० मिनिटे चाललेल्या सामन्यात जपानच्या नाओमी ओकुहाराकडून, तर २०१८ मध्ये स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
सिंधू गत महिन्यात इंडोनेशिया ओपन स्पर्धेत उपविजेती ठरली होती. सध्या ती आपल्या बचाव व तंदुरुस्तीवर मेहनत घेत आहे. सिंधूला पहिंल्या फेरीत बाय मिळाला असून चीनी तैपईची पाई यू पो व बुल्गारियाची लिंडा जेचिरी यांच्यातील विजेतीविरुद्ध ती खेळेल.
- पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत दुखापतीनंतर स्पर्धेेत सहभागी होईल. त्याने गेल्या २२ महिन्यात विश्व टूर मध्ये कोणतेही जेतेपद पटकावलेले नाही. तो सलामीला आयर्लंडच्या नाट एनगुयेनविरुद्ध खेळेल. समीर वर्मा सिंगापूरच्या लोह कीन ययूविरुद्ध लढेल.
मी बचाव, शारिरिक तंदुरुस्तीवर सध्या भर देत आहे. यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. त्यामुळे स्पर्धेत मला चांगल्या कामगिरीची आशा आहे. माझ्यावर या स्पर्धेत कोणताही दबाव नाही. - पी. व्ही. सिंधू