स्वीस ओपन बॅडमिंटन : समीर वर्माची उपांत्य फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:44 PM2018-02-24T23:44:43+5:302018-02-24T23:44:43+5:30

भारताचा स्टार खेळाडू समीर वर्मा याने जागतिक क्रमवारीत नंबर दोनवर असलेला माजी खेळाडू केंटो मोमोटो याला नमवून १ लाख ५० हजार डॉलर पुरस्कार रकमेच्या स्वीस ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

 Swiss Open Badminton: Sameer Verma clash in semifinals | स्वीस ओपन बॅडमिंटन : समीर वर्माची उपांत्य फेरीत धडक

स्वीस ओपन बॅडमिंटन : समीर वर्माची उपांत्य फेरीत धडक

Next

बासेल : भारताचा स्टार खेळाडू समीर वर्मा याने जागतिक क्रमवारीत नंबर दोनवर असलेला माजी खेळाडू केंटो मोमोटो याला नमवून १ लाख ५० हजार डॉलर पुरस्कार रकमेच्या स्वीस ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सय्यद मोदी ग्रॅण्डप्रिक्स स्पर्धेचा सुवर्णविजेता समीरने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात शनिवारी मोमोटोवर २१-१७, २१-१६ ने विजय नोंदविला. जपानच्या २३ वर्षांच्या मोमोटोवर २०१६ मध्ये कॅसिनोत गेल्यावरून वर्षभराची बंदी घालण्यात आली होती.
व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या आॅस्ट्रिया ओपन आंतरराष्टÑीय चॅलेंज स्पर्धेत राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन पारुपल्ली कश्यप याने अंतिम फेरीत धडक दिली. कश्यपने शानदार विजयी घोडदौड कायम राखून सातवा मानांकित डेन्मार्कचा व्हिक्टर स्वेंडसन याच्यावर २१-१७, २१-१९
ने विजय साजरा केला. निर्णायक सामन्यात त्याची गाठ पडेल ती
पाचवा मानांकित रॉल मस्ट याच्याविरुद्ध. (वृत्तसंस्था)

- २०१६ मध्ये हाँगकाँग सुपर सिरीज बॅडमिंटनची उपांत्य फेरी गाठणाºया समीरची उपांत्य फेरीत थायलंडचा कांटाफोन वांगचारोएन याच्याविरुद्ध गाठ पडेल. एम. आर. अर्जुन- श्लोक रामचंद्रन यांची जोडी पुरुष दुहेरीत थायलंडचे मॅनीपोंग जोंगजित-नानथाकर्ण योर्डफायसोंग
यांच्याकडून १३-२१, १८-२१ ने
पराभूत झाली.

Web Title:  Swiss Open Badminton: Sameer Verma clash in semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.