Thailand Open Badminton : पी.व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 07:48 PM2018-07-13T19:48:42+5:302018-07-13T19:49:05+5:30
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने थायलंड खुल्या वर्ल्ड टूअर सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
बँकॉक - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने थायलंड खुल्या वर्ल्ड टूअर सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तिने मलेशियाच्या सोनिया चिआहचा सरळ गेममध्ये पराभव केला. दुस-या मानांकित सिंधूने सातत्यपूर्ण कामगिरी करताना 21-17, 21-13 असा विजय साजरा केला. जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या सिंधूसमोर उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्काचे आव्हान असणार आहे.
🇮🇳 PV Sindhu thrashes 🇲🇾 Soniia Cheah 21-17, 21-13 in QF of #ThailandOpen2018
— Sportskeeda (@Sportskeeda) July 13, 2018
A momentary scare in the first set when Cheah got a 4-pt lead. However, once 🇮🇳 No. 1 got going, there was no stopping her.
Sindhu will now face 🇮🇩 Gregoria Mariska Tunjung (WR 29) in the SF. pic.twitter.com/vGZPCZTC9U
मलेशियाच्या सोनियाने दमदार खेळ करताना पहिल्या सेटमध्ये 11-7 अशी आघाडी घेतली होती. मात्र, सिंधूने हळुहळू सामन्यावर पकड घेताना 13-12 असे कमबॅक केले. त्यानंतर सिंधूने खेळात सातत्य राखून हा सेट 21-17 असा जिंकला. दुस-या गेममध्ये तिने 11-9 अशा आघाडीनंतर सलग नऊ गुणांची कमाई केली आणि विजय निश्चित केला.