अव्वल २० मध्ये पाच भारतीय शटलर्स, सिंधू दुस-या स्थानी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:53 AM2017-09-29T00:53:41+5:302017-09-29T00:54:02+5:30

बीडब्लूएफ बॅडमिंटन पुरुष एकेरी रँकिंगमध्ये अव्वल २० खेळाडूंमध्ये पाच भारतीय खेळाडूंचा समावेश झाला आहे. यात सर्वात जास्त फायदा गेल्या आठवड्यात जपान ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहचणा-या एच.एस. प्रणयला झाला आहे.

In the top 20, five Indian shuttlers, Sindhu remained in second place | अव्वल २० मध्ये पाच भारतीय शटलर्स, सिंधू दुस-या स्थानी कायम

अव्वल २० मध्ये पाच भारतीय शटलर्स, सिंधू दुस-या स्थानी कायम

Next

नवी दिल्ली : बीडब्लूएफ बॅडमिंटन पुरुष एकेरी रँकिंगमध्ये अव्वल २० खेळाडूंमध्ये पाच भारतीय खेळाडूंचा समावेश झाला आहे. यात सर्वात जास्त फायदा गेल्या आठवड्यात जपान ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहचणा-या एच.एस. प्रणयला झाला आहे. तो १५ व्या स्थानावर आहे. सिंधूने दुसरे स्थान कायम राखले आहे.
प्रणय याने रँकिंगमध्ये चार स्थानांनी आघाडी घेतली आहे. तर जपान ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचणाºया किदाम्बी श्रीकांत याने आठवे रँकिंग कायम ठेवले आहे. तो पुरुष एकेरीमधील अव्वल स्थानावर असलेला भारतीय खेळाडू आहे.
अजय जयराम गेल्या आठवड्याप्रमाणेच विसाव्या तर बी.साई प्रणित १७ व्या स्थानावर आहे. समीर वर्मा याने १९ स्थान मिळवले आहे.
महिला एकेरीत पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी अनुक्रमे दुसरे आणि बारावे स्थान कायम राखले आहे. या दोन्ही खेळाडूंना जपान ओपनच्या दुस-या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. (वृत्तसंस्था)

मिश्र जोडीला फायदा
सिक्की रेड्डी आणि प्रणव जेरी चोप्रा यांच्या मिश्र दुहेरी जोडीने जपान ओपनच्या उपांत्य फेरीत पोहचल्याचा फायदा झाला. त्यांनी रँकिंगमध्ये १७ वे स्थान मिळवले.

Web Title: In the top 20, five Indian shuttlers, Sindhu remained in second place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.