विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप - सिंधूचं 'सुवर्ण'स्वप्न भंगलं, रौप्य पदकावर समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 07:32 PM2017-08-27T19:32:20+5:302017-08-28T00:38:17+5:30
रिओ ऑॅलिम्पिक रौप्य विजेत्या स्टार पी. व्ही. सिंधूचे ग्लासगो शहरात सुरु असलेल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वर्न भंगले
ग्लास्गो, दि. 27 - रिओ ऑॅलिम्पिक रौप्य विजेत्या स्टार पी. व्ही. सिंधूचे ग्लासगो शहरात सुरु असलेल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वर्न भंगले. अटीतटीच्या लढतीत जपानच्या नोजोमी ओकुहाराने सिंधूचा 2-1 ने पराभव केला. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानवे लागले.
चुरशीच्या सामन्यात जपानच्या नोजोमी ओकुहाराने सिंधूचा पराभव केला. त्यामुळे सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ग्लासगोत सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओकुहारा हिने सिंधूवर २१-१९, २०-२२, २२-२० असा विजय मिळवला आहे. सिंधूच्या दमदार सुरुवातीनंतरदेखील नोजोमीने अटीतटीची लढत देत पहिला गेम जिंकला. जपानच्या नोजोमी ओकुहाराने पहिला गेम १९-२१ असा जिंकला. दुस-या गेममध्ये सिंधूने नोजोमीवर वर्चस्व गाजवत विजय मिळवला. मात्र अंतिम गेममध्ये सिंधूला पुन्हा एकदा नोजोमीकडून २०-२२ असा पराभव पत्करावा लागला. नोजोमी ओकुहारा हिने शनिवारी सायना नेहवाल हिचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
बॅडमिंटन असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. हिमांता बिस्वा शर्मा यांनी सिंधूला १०, तर सायनाला रोख ५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधूचे अभिनंदन करीत म्हणाले, ‘तू उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहेस. देशाला तुझ्यावर गर्व आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे.’
दरम्यान, 2013 आणि 2014 मध्ये कांस्य पदक जिंकणा-या 22 वर्षांच्या पी. व्ही. सिंधूने शनिवारी झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चीनच्या चेन युफेईवर 48 मिनिटांत 21-13, 21-10 अशा फरकाने विजय मिळवला. तर, उपात्यंपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधूने विश्व क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली चीनच्याच सून यू हिच्यावर सरळ गेममध्ये विजय नोंदवित कास्य पदक निश्चित केले होते. यावेळी सून यू हिच्यावर 39 मिनिटांत 21-14, 21-9 अशी मात करत पी.व्ही. सिंधूने उपांत्य फेरी गाठली होती.
नोजोमी ओकुहारा हिने शनिवारी भारताची फुलराणी आणि लंडन ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे सायना नेहवाल हिला विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. यावेळी नोजोमीने 12-21, 21-17, 21-10 अशा सरळ सेटमध्ये सायना नेहवालचा पराभव केला.