World Badminton Championships 2018: सिंधू, साईप्रणितच्या विजयाचा भारतीयांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 04:33 PM2018-08-01T16:33:26+5:302018-08-01T16:54:32+5:30
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचा तिसरा दिवस भारतीयांसाठी निराशाजनक राहीला. एकापाठोपाठ एक खेळाडूंचे आव्हान संपुष्टात येत असताना ऑलिम्पिक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणित यांच्या विजयाने भारतीयांच्या चेह-यावर स्मिथ फुलवले.
नानजिंग (चीन) : जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचा तिसरा दिवस भारतीयांसाठी निराशाजनक राहीला. एकापाठोपाठ एक खेळाडूंचे आव्हान संपुष्टात येत असताना ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणित यांच्या विजयाने भारतीयांच्या चेह-यावर स्मिथ फुलवले. स्पर्धेच्या सकाळच्या सत्रात किदम्बी श्रीकांतने विजयी धडाका कायम राखला होता.
रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या सिंधूने बुधवारी इंडोनेशियाच्या फित्रीयानीचे आव्हान 21-14, 21-9 असे सहज परतवले. तिने पहिला गेम अवघ्या 15 मिनिटांत 21-14 असा जिंकून आघाडी घेतली. हा गेम 4-4 असा बरोबरीत असताना सिंधूने जबरदस्त स्मॅश लगावले आणि 17-7 अशी आघाडी वाढवली. त्यानंतर फित्रीयानीने 5 गुण घेत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण, जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या सिंधूने हा गेम जिंकला.
जागतिक स्पर्धेत दोन कांस्य ( 2013 व 2014) आणि एक रौप्यपदक ( 2017) जिंकणा-या सिंधूच्या आक्रमक खेळासमोर इंडोनेशियाची खेळाडू निष्प्रभ झालेली पाहायला मिळाली. त्याचाच फायदा उचलत सिंधूने हाही गेम 21-9 असा जिंकला आणि विजयी सलामी दिली.
TOTAL BWF World Championships 2018
— BWFScore (@BWFScore) August 1, 2018
WS - Round of 32
21 21 🇮🇳V. Sindhu PUSARLA🏅
14 9 🇮🇩Fitriani FITRIANI
🕗 in 35 minutes
https://t.co/UwBtngS2A3
पुरूष एकेरीत बी साईप्रणितने 33 मिनिटांत स्पेनच्या लुइक एन्रीक पेनालव्हेरचा 21-18, 21-11 असा पराभव केला आणि उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुस-या लढतीत एच एस प्रणॉयलाही धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ब्राझिलच्या यगोर कोएल्हो या बिगरमानांकित खेळाडूने 0-1 अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना 8-21, 21-16, 21-15 अशा फरकाने प्रणॉयला पराभूत केले.
TOTAL BWF World Championships 2018
— BWFScore (@BWFScore) August 1, 2018
MS - Round of 32
21 21 🇮🇳B. SAI PRANEETH🏅
18 11 🇪🇸Luís Enrique PEÑALVER
🕗 in 33 minutes
https://t.co/dnoVAYgETi
पुरूष दुहेरीत सात्विकसाईराज रँकिरेड्डी व चिराग शेट्टी यांना 1 तास 08 मिनिटांच्या संघर्षानंतर पराभव पत्करावा लागला. डेन्मार्कच्या किम अॅस्ट्रप व आंद्रेस रॅस्मुसेन यांनी 21-18, 15-21, 21-16 अशा फरकाने भारतीय खेळाडूंचा पराभव केला. मनू अत्री व बी सुमिथ रेड्डी यांना कडव्या संघर्षानंतर जपानच्या ताकुटो इंक्यू व युकी कानेको यांच्याकडून 24-22, 13-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला.
TOTAL BWF World Championships 2018
— BWFScore (@BWFScore) August 1, 2018
MD - Round of 32
🇯🇵Takuto INOUE🏅
22 21 21 🇯🇵Yuki KANEKO🏅
24 13 16 🇮🇳Manu ATTRI
🇮🇳B. Sumeeth REDDY
🕗 in 61 minutes
https://t.co/on7OOmbo2w
महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांचेही आव्हान संपुष्टात आले. जपानच्या युकी फुकुशीमा व सकाया हिरोटा या जोडीने 21-14, 21-15 अशा फरकाने 37 मिनिटांत पोनप्पा-रेड्डी यांना गाशा गुंडाळण्यास भाग पाडले.