विश्व बॅडमिंटन :प्रणय, समीर दुसऱ्या फेरीत; दुहेरी आणि मिश्र प्रकारातही भारतीयांचे विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 04:43 AM2018-07-31T04:43:27+5:302018-07-31T04:43:43+5:30
एच. एस. प्रणय आणि समीर वर्मा यांनी सरळ गेममध्ये विजय नोंदवित सोमवारी बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपची दुसरी फेरी गाठली.
नानजिंग (चीन) : एच. एस. प्रणय आणि समीर वर्मा यांनी सरळ गेममध्ये विजय नोंदवित सोमवारी बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपची दुसरी फेरी गाठली.
विश्व क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेल्या प्रणयने न्यूझीलंडचा अभिनव मनोटा याच्यावर २१-१२, २१-११ ने विजय नोंदवित शानदार सुरुवात केली, तर समीरने फ्रान्सचा लुकास कोर्वी याच्यावर २१-१३, २१-१० अशा फरकाने विजय नोंदविला. यंदा आशियाई स्पर्धेचे कांस्य जिंकणाºया प्रणयला दुसºया फेरीत ब्राझीलचा यगोर कोल्हो याच्याविरुद्ध; तसेच स्विस ओपनचा विजेता समीरला चीनचा दिग्गज दोनवेळेचा आॅलिम्पिक सुवर्णविजेता लिन डॅन याच्याविरुद्ध खेळायचे आहे.
विश्व क्रमवारीत ३९ व्या स्थानावर असलेले सात्त्विक साईराज रंकी रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांच्या मिश्र जोडीने डेन्मार्कचे निकलास नोर आणि सारा त्यागसेन यांचा २१-९, २२-२० ने पराभव केला.
भारताची अव्वल मानांकित मिश्र जोडी प्रणव जेरी चोप्रा-एन.
सिक्की रेड्डी यांनीही शानदार
सुरुवात केली. २२ व्या स्थानावरील या जोडीने झेक प्रजासत्ताकचे जाकूब बिटमॅन-अल्जेबेटा- बाहोवा यांच्यावर २१-१७, २१-१५ ने विजयाची नोंद केली.
संयोगीता घोरपडे-प्राजक्ता सावंत यांच्या महिला दुहेरी जोडीला मात्र तुर्कस्थानची जोडी बेंगिसू इन्सेंटिन-नाजकिलान इन्सी यांच्याकडून २०-२२, १४-२१ ने पराभवाचा धक्का बसला. (वृत्तसंस्था)
मनू अत्री-बी. सुमीतरेड्डी यांची आगेकूच
पुरुष दुहेरीत मनू अत्री-बी. सुमीतरेड्डी यांच्या जोडीने बल्गेरियाचे डॅनियल निकोलोव- इवान रूसेव यांचा २१-१३, २१-१८ ने पराभव केला.
सौरभ शर्मा-अनुष्का पारिख; तसेच रोहन कपूर- कुहू गर्ग या
युवा मिश्र जोडीनेदेखील दमदार विजय नोंदवून दुसºया फेरीत धडक दिली.
सौरभ-अनुष्का यांनी नायजेरियाचे इंजोह अबाह- पीस ओर्जी यांच्यावर २१-१३,२१-१२ ने आणि रोहन-कुहू यांनी कॅनडाचे टोबी एनजी- राचेल हेंड्रिच यांचा २१-१९,२१-६ ने पराभव केला.